नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून मुंबई , कोलकता आणि दिल्ली या शहरांमधील हवा प्रदूषण हा चर्चेचा विषय बनला आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वाढते प्रदूषण धोक्याची घंटा ठरत आहे. दिल्ली-NCR मध्ये अक्षरशः विषारी धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे.
दिल्लीतील हवा विषारी
दिल्लीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 450 च्या आसपास आहे. तर नोएडामध्ये परिस्थिती अधिकच गंभीर आहे. नोएडा येथे AQI 450 च्या आसपास आहे. याचा अर्थ ज्यावेळी नोएडामध्ये AQI 616 असेल तेव्हा प्रत्येक व्यक्ती 10 सिगारेटच्या बरोबरीने प्रदूषित हवा शरीरात घेत आहे. ही अनेकांसाठी घातक परिस्थिती आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहेत.
प्रशासनाच्या उपाय-योजना ठरत आहे अपुऱ्या
दिल्ली आणि परिसराला प्रदूषणाने विळखा घातला आहे. 10 सिगारेट ओढण्याने एखाद्या व्यक्तीला जो धोका निर्माण होऊ शकतो, तेवढ्या प्रदूषित हवेत दिल्लीकर सध्या जगत आहे. यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांना जळजळ, तसेच इतरही आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत.
दिल्लीमधील AQI 450 च्या आसपास आहे तर नोएडामध्ये परिस्थिती आणखी वाईट आहे. येथे AQI ने 600 ची पातळी ओलांडली आहे. तज्ज्ञांच्या मते, नोएडामध्ये AQI 616 असेल तेव्हा प्रत्येक व्यक्ती 10 सिगारेटच्या बरोबरीने प्रदूषित हवा ग्रहण करत आहे. दिल्ली – एनसीआरमधील लोकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रदूषणाचा सामना करावा लागतो. यंदाही प्रदूषण नियंत्रणसाठी अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. टँकरद्वारे रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे जेणेकरून धूळ कमी होईल आणि एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सुधारेल, परंतु ही व्यवस्था प्रभावी ठरत नाही, अशी स्थिती आहे. सरकारने अनेक पावले उचलली आहेत, पण ती अपुरी ठरत आहेत.
दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाची परिस्थिती खुपचं गंभीर होत आहे. महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, ओव्हरब्रिज, वीज केंद्र, पाईपलाइन अशा सार्वजनिक प्रकल्पांमध्ये बांधकाम आणि पाडकामावर बंदी घालण्यात आली आहे. GRAP-4 टप्प्यामध्ये सार्वजनिक प्रकल्पांशी संबंधित बांधकाम , प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर दिल्लीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर, CNG, इलेक्ट्रिक आणि BS-VI वाहनांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय CAQM ने सल्ला दिला आहे की दिल्ली-NCR मधील प्राथमिक शाळांना सुटी देण्यात यावी. त्यासोबतच इयत्ता 6वी, 9वी आणि 11वीचे वर्ग ऑनलाइन सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
वृद्ध आणि गरोदर महिलांना विशेष काळजीच्या सूचना
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वृध्द व्यक्ती , शाळकरी मुले आणि गरोदर महिलांमध्ये डोके दुखी, चिडचिड यासारख्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळणेच हिताचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
AQI म्हणजे काय?
AQI म्हणजे काय, ते कसे कार्य करते? AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स किंवा मराठीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक म्हटले जाते. याद्वारे हवेची गुणवत्ता तपासली जाते. यावरून भविष्यातील वायू प्रदूषणाचीही कल्पना येते. AQI चा मुख्य उद्देश सभावतालच्या हेवच्या गुणवत्तेचा आरोग्यावर कसा परिणार होतो, हे जाणून घेण्यासाठीही मदत होते.