JKLF च्या Yasin Malik च्या शिक्षेबाबत आज सुनावणी; टेरर फंडिंगचे आरोप केले मान्य

न्यायालयाने यापूर्वी यासिनशिवाय इतर काश्मिरी फुटीरतावाद्यांवर आरोप निश्चित केले आहेत.

delhi nia court may sentence yasin malik in kashmir terror funding case today he had pleaded guilty
JKLF च्या Yasin Malik च्या शिक्षेबाबत आज सुनावणी; टेरर फंडिंगचे आरोप केले मान्य

टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या शिक्षेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. यासिन मलिकच्या वतीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने गेल्या सुनावणीत त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधनक कायद्याअंतर्गत (UAPA) दोषी ठरवले होते. यावेळी न्यायालयाने शिक्षेवर चर्चेसाठी 25 ने ही तारीख निश्चित केली होती. मलिकवर लावण्यात आलेल्या कलमांनुसार त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा किंवा किमान जन्मठेपेची शिक्ष होऊ शकते.

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) प्रमुख यासिन मलिकने दहशतवाद आणि टेरर फंडिंग प्रकरणी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली होती. 10 मे रोजी यासीनने न्यायालयात सांगितले की, तो त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही. यासिनवर UAPA च्या कलम 16 (दहशतवादी कृत्य), कलम 17 (दहशतवादासाठी पैसा गोळा करणे), कलम 18 (दहशतवादी कृत्यांसाठी कट आखणे) आणि कलम 20 (दहशतवादी गटाचा सदस्य असणे) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्यावर कलम १२० बी (गुन्हेगारी कट) आणि कलम १२४ ए अंतर्गत (देशद्रोह) आरोप आहेत.

हेही वाचा : फुटीरतावादी नेता यासिन मलिक पुन्हा एकदा जेल बंद

यावर न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते की, यासिनने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरात मोठे नेटवर्क तयार केले होते. 19 मे रोजी विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी मलिकला दोषी ठरवले आणि त्याच्यावर किती दंड आकारला जाऊ शकतो हे ठरवण्यासाठी एनआयएला त्याच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यास सांगितले. यासिनला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासही सांगितले होते.

न्यायालयाने यापूर्वी यासिनशिवाय इतर काश्मिरी फुटीरतावाद्यांवर आरोप निश्चित केले आहेत. ज्यात फारुक अहमद डार उर्फ ​बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन, कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशिद शेख आणि नवलकिशोर कपूर यांचा समावेश आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! NIA कोर्टाने यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले

तर लष्कर-ए-तोय्यबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. न्यायालयाने तीन आरोपी कामरान युसूफ, जावेद अहमद भट्ट आणि सय्यद आसिया फिरदौस अंद्राबी यांची निर्दोष मुक्तता केली होती.


केंद्राचा मोठा निर्णय; 1 जूनपासून साखर निर्यातीवर घातली बंदी