घरदेश-विदेशदिल्लीतील चार मजली इमारत कोसळून १ ठार; काहीजण अडकल्याची भिती

दिल्लीतील चार मजली इमारत कोसळून १ ठार; काहीजण अडकल्याची भिती

Subscribe

दिल्लीच्या सीलमपूर भागातील चार मजली इमारत कोसळून १ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीच्या सीलमपूर भागातील इमारत कोसळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. सीलमपूर येथे एक चार मजली इमारत कोसळून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे समोर आले आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दालाच्या ६ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरु आहे.

- Advertisement -

सीलमपूर येथे कोसळणाऱ्या इमारतीखाली अनेक रहिवासी अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आगे. रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरुच होते. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य सहा जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -