घरताज्या घडामोडीCOVID-19 'toolkit' case : दिल्ली पोलिसांचा ट्विटरच्या कार्यालयावर छापा

COVID-19 ‘toolkit’ case : दिल्ली पोलिसांचा ट्विटरच्या कार्यालयावर छापा

Subscribe

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने ट्विटरला मॅनिप्युलेटेड मिडिया प्रकरणात नोटीस पाठवली आहे. नरेंद्र मोदी सरकारविरोधात काही पोस्टला Manupulated media टॅग वापरल्याच्या प्रकरणातील ही चौकशीच्या निमित्ताने नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात या कथित टूलकीट प्रकरणात ट्विटरलाही माहिती शेअर करण्यासाठी सांगितले आहे. तसेच ट्विटरने मॅनिप्युलेटेड मिडिया हा टॅग का वापरला याचेही स्पष्टीकरण देण्याचे नोटीशीत म्हटले आहे. आज सोमवारी सायंकाळी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची टीम ट्विटर इंडियाच्या कार्यालयात दाखल झाली. दिल्लीत तसेच गुरगावच्या ट्विटरच्या कार्यालयात ही छापेमारी टीमकडून करण्यात आली असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. त्याआधीच दुपारी या टीमने ट्विटरला नोटीस पाठवली होती.

- Advertisement -

याआधीच माहिती तंत्रज्ञान विभागाकडून ट्विटरला मॅनिप्युलेटेड मिडिया प्रकरणात विचारणा करण्यात आली होती. तसेच कॉंग्रेसच्या मोदी सरकारविरोधी टूलकीटला मॅन्युप्युलेटेड मिडिया टॅग का लावला ? अशीही विचारणा करण्यात आली. या प्रकरणात मॅन्युप्युलेटेड मिडिया टॅग काढण्याचेही ट्विटरला सांगण्यात आले होते. हे प्रकरण लॉ एन्फोर्समेंट एजन्सीसमोर चौकशीसाठी असल्याचे आयटी मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. पण ट्विटरने हे बदल करताच त्या टॅगसह ट्विट तसेच ठेवले असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच ट्विटर पक्षपातीपणा करण्याचा आरोप करत आपली विश्वासाहर्ता गमावत आहे असेही आयटी मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

भाजपकडून १८ मे रोजी झालेल्या एका पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे कोरोना महामारीवरील टूलकीट सादर केले होते. त्यामध्ये covid-19 म्युटंटला Indian strain किंवा Modi strain असा उल्लेख करणे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांच्या विरोधात असा उल्लेख करणे असे आवाहन कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केल्याचा आरोप टूलकीटच्या निमित्ताने केला होता. पण कॉंग्रेसने हे आरोप फेटाळून लावत दिल्ली पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणात तक्रार केली. तसेच भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली. खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून समाजातील शांतता बिघडवणे तसेच मोदी सरकारच्या अपयशातून विषयाला वळवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचा कॉंग्रेसने आरोप केला होता. भाजपकडून #CongressToolkitExposed या हॅशटॅगचा वापर झाल्यानंतरच ही तक्रार करण्यात आली होती.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -