दिल्लीतून १५ वर्षांपासून लपून बसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47 सह मोठा शस्त्र साठा जप्त

Delhi Police arrest Pakistani terrorist, avert major terror attack in capital
दिल्लीतून १० वर्षांपासून लपून बसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47 सह मोठा शस्त्र साठा जप्त

दिल्लीतील लक्ष्मी नगरमधून लपून बसलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-४७, हँड ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याची आता कसून चौकशी सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा दहशतवादी जवळपास १५ वर्षे दिल्लीत लपून बसला होता. सतत तो त्याच्या पाकिस्तानी म्होरक्यांच्या संपर्कात राहत भारतविरोधी कारवायांसाठी योजना आखत होता.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास मोहम्मद अशरफ नूरी उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी अशरफ हा पाकिस्तानातील पंजाबमधील नरोवल जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत होता. तसेच पाकिस्तानमधीलस सूत्रधारांना माहिती पुरवत होता.

पाक दहशतवादी अशरफने दिल्लीतच एका महिलेशी लग्न केले. पण चौकशीदरम्याने त्याने पत्नी आता त्याच्यासोबत राहत नसल्याची माहिती दिली आहे, मात्र पोलिसांना तो बरीच माहिती लपवत असल्याचा संशय आहे. असं सूत्रांनी सांगितले. दरम्यान अशरफला दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून AK-47 रायफलसह अतिरिक्त मॅग्झिन, ६० जिवंत काडतुसं, एक हातबॉम्ब, ५० जिवंत काडतुसं आणि २ अत्याधुनिक पिस्तुल जप्त असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

नूरी उर्फ अशरफ नावाचा हा दहशतवादी दिल्लीतील पाकिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलचा प्रमुख म्हणून काम करत होता असे सांगितले जाते. स्लीपर सेलचे प्रमुख असल्याने पाकिस्तान दहशतवादी जेव्हा कधी दिल्लीच्या आसपास कोणतीही घटना घडवण्याचा प्लॅन आखत होते, तेव्हा ते नूरीशी संपर्क साधत होते. अशरफचा जम्मू -काश्मीर आणि देशाच्या इतर भागातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये हात होता.

दहशतवादी मोहम्मद अशरफ बनावट आयडीच्या आधारे अहमद नूरीच्या नावाने भारतात राहत होता. यावर त्याने भारतीय पासपोर्टही मिळवला होता. या कागदपत्रांसाठी त्याने गाझियाबादमधील एका भारतीय महिलेशी लग्न केले होते. त्याच्याकडे बिहारमधील ओळखपत्र आढळले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहत स्लीपर सेल म्हणून काम करत होता. याशिवाय दिल्लीतील शास्त्री नगर येथील एका घरात तो काम करत होता. असं दिल्लीच्या स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितलं.

हा दहशतवादी भारतात मोठा घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला अद्याप कोणतेही टार्गेट दिलेले नव्हते. तो बांगलादेशातून सिलिगुडी मार्गे भारतात घुसला होता. आयएसआयसाठीही तो काम करत होता. याशिवाय त्याने दोन वेळा विदेश दौऱ्यावर गेला होता. त्याला टास्क देण्यात आले होते. त्याला नासिर असे कोड नाव देण्यात आले होते. तो पीर मौलाना म्हणून काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं.


Facebook, Insta, WhatsAPP पाठोपाठ आता Gmail डाऊन, ट्विटरवर तक्रारींचा पूर