श्रद्धा हत्या प्रकरण : दिल्ली पोलिसांकडून 3 हजार पानांचे आरोपपत्र तयार

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास पुर्ण केला आहे. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे.

shraddha murder case who is that girl whom aftab called at home after shraddhas murder police discovered

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास पुर्ण केला आहे. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. या आरोपपत्रात नार्को टेस्ट, पॉलीग्राफी आणि डीएनए टेस्टचा अहवालही समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच 100 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी तीन हजार पानांचे आरोपपत्र कायदेतज्ज्ञांचा टीमकडे पाठवण्यात आले आहे. पुढच्या दोन दिवसांत आरोपपत्र न्यायालात दाखल होणार आहे. (Delhi Police draft 3000 page charge sheet in shraddha murder case)

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपपत्र मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये घटनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जंगलातून सापडलेल्या हाडांच्या डीएनए अहवालाबरोबरच पोलिसांनी आरोपी आफताबच्या नार्को आणि पॉलीग्राफ चाचणी आणि इतर फॉरेन्सिक चाचण्यांचा अहवालही आरोपपत्रात जोडले आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी साक्षीदारांच्या जबाबातून हा संपूर्ण प्रकार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. कायदेतज्ज्ञांचे मत जाणून घेतल्यानंतर पोलीस याच आठवड्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसेच, सध्या एकही प्रश्न शिल्लक नाही, ज्याची उत्तरे या आरोपपत्रात नाहीत.

दरम्यान, श्रद्धा वालकरच्या 23 हाडांचे पोस्टमार्टन करण्यात आले. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. डीएनए टेस्टमध्ये ही हाडे श्रद्धाची असल्याचा अहवाल आला होता. डीएनए अहवालासाठी श्रद्धाच्या वडिलांचे सॅम्पल वापरण्यात आले होते. ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एम्समध्ये त्याचे विश्लेषण केले गेले. या विश्लेषणात करवतीने हाडे कापल्याचे स्पष्ट झाले. करवतीचे निशानही त्यावर सापडले आहेत.

लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याने 18 मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या केली होती. या हत्येची आफताबने कबुलीही दिली आहे.


हेही वाचा – कोईम्बतूरहून हिस्सारला जाणाऱ्या ट्रेनला आग; मालडबा जळून खाक