दिल्ली एम्स रुग्णालयातील सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांचे निलंबन, पोलिसांकडून तपास सुरु

delhi police file fir in aiims delhi ransomware attack

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील ( एम्स) सायबर हल्ल्यामुळे येथील सर्व्हर दोन दिवसांपासून अद्याप बंद आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही गुरूवारी संध्याकाळी बंद करण्यात आला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे. याप्रकरणी एम्स व्यवस्थापनाने संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांनी निलंबित केले आहे. एम्स व्यवस्थापनाने एक निवेदनात रॅन्समवेअर सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली होती, सुरक्षा यंत्रणांनी अद्याप याची पुष्टी केली नाही.

एम्स नवी दिल्ली सर्व्हर हॅक प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल सुमारे 11 ते 12 तास सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एम्सच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस याप्रकरणी सध्या तपास करत आहेत.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील सर्व्हर बंद झाल्याने एकच खळबळ उडाली. देशाच्या सर्वोच्च एजन्सीच्या सर्व्हर झालेला हा हल्ला पाहाता ही देशाच्या सुरक्षेशी निगडीत मोठी घटना असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ऑनलाईन यंत्रणा बंद झाल्याने आता रुग्णांची देखभाल व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. याप्रकरणी सध्या दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे. एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा एक मोठा सायबर हल्ला असल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच सरकारी पातळीवर हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल