घरताज्या घडामोडीFarmer Protest Delhi: हिंसाचार थांबवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांसमोर जोडले हात

Farmer Protest Delhi: हिंसाचार थांबवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांसमोर जोडले हात

Subscribe

प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान हिंसा आणि उपद्रवाच्या अनेक घटना झाल्या. शेतकऱ्यांचे हे हिंसक आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. यादरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यामध्ये ८०हून अधिक पोलीस जखमी झाले असून आंदोलनमधल्या अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात अनेक शेतकरी देखील जखमी झाले आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पहिल्यांदा पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांनी काही ऐकलं नाही, त्यावेळेस पोलीस रस्त्यावरच बसले. शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊन शांतता भंग करू नये यासाठी दिल्ली पोलिसांना शांत राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकऱ्यांना हात जोडून पोलिसांनी, आम्हाला मारू नका, अशी देखील विनंती केली.

एकबाजूला शेतकरी आंदोलकांवर अश्रुगोळे आणि लाठीचार्ज केली जात होती. तर दुसरीकडे दिल्लीत लोकांना शेतकरी आंदोलनकांवर फुलांचा वर्षाव केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे दिल्लीतील रस्ते ठप्प झाले होते. यावेळी पोलिसांना सामान्य वाहतुकीसाठी अनेक ठिकाणी रस्ते वळवावे लागले. ट्रॅक्टर रॅलीसाठी घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन आंदोलन केले. काही ठिकाणी हाणामारी आणि दगडफेकही झाली. माहितीनुसार शेतकऱ्यांच्या हिंसाचारामध्ये ३०० जखमी झाल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

दरम्यान दिल्ली हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे समोर येत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे तीन निवृत्त न्यायाधिशांमार्फत आयोग स्थापन करून याद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शेतकरी हिंसाचार प्रकरणी अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -