(Delhi Police Report) नवी दिल्ली : काही व्हीआयपींना पुरविण्यात आलेल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत निर्णय घेण्यास दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाला सांगितले आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस लवकरच गृह मंत्रालयाला 18 माजी राज्यमंत्री आणि 12 माजी खासदारांची यादी पाठवणार आहेत. या व्हीआयपींना कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही सुरक्षा देण्यात येत आहे. (Security of 30 VIPs will be removed)
दिल्ली पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्था युनिटने काही महिन्यांपूर्वी एक ऑडिट केले होते. अनेकांना सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली असून काहीच्या बाबतीत बऱ्याच काळापासून त्याचा आढावाच घेतलेला नाही, असे त्यात आढळले. या ऑडिटनंतर, अनेक लोकांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली. पण अनेक राज्यमंत्री, खासदार आणि इतरांना त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले, असे एका इंग्रजी दैनिकाने दिल्ली पोलीस मुख्यालयातील सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे.
हेही वाचा – Kumar Vishwas about Kareena Kapoor : कुमार विश्वास यांच्या निशाण्यावर करिना कपूर, म्हणाले…
ऑडिट रिपोर्टमध्ये ज्यांची नावे आहेत त्यात वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था असलेले माजी राज्यमंत्री भागवत कराड, देवूसिंह चौहान, भानुप्रताप सिंह वर्मा, जसवंतसिंग भाभोर, जॉन बारला, कौशल किशोर, कृष्णा राज, मनीष तिवारी, पी पी चौधरी, राजकुमार रंजन सिंह, रामेश्वर तेली, एस एस अहलुवालिया, संजीव कुमार बालियान, सोम प्रकाश, सुदर्शन भगत, व्ही मुरलीधरन, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग आणि विजय गोयल यांचा समावेश असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
त्याचबरोबर, अजय भट्ट, अश्विनीकुमार चौबे आणि बिश्वेश्वर टुडू हे विद्यमान राज्यमंत्रीदेखील आहेत. यांचे प्रोफाइल बदलले असले तरी, मागील खात्यानुसार त्यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. ऑडिट रिपोर्टनुसार, सर्व माजी राज्यमंत्र्यांच्या घरी अजूनही तीन पीएसओ आणि चार पोलीस आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
या ऑडिटनंतर दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी गृह मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. या ऑडिट अहवालात माजी खासदार गौतम गंभीर, अभिजित मुखर्जी, डॉ. करण सिंग, मौलाना महमूद मदनी, नबाकुमार सरनिया, रामशंकर कठेरिया, अजय माकन (आता राज्यसभा सदस्य), के सी त्यागी, परवेश वर्मा, राकेश सिन्हा, रमेश बिधुरी आणि विजय इंदर सिंगला यांची नावे असल्याचेही समजते. (Delhi Police Report: Security of 30 VIPs will be removed)
हेही वाचा – SS UBT on Mahayuti : आघाडीच्या सरकारची एक मजबुरी असते…, ठाकरे गट असे का म्हणाला?