दहशतवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या हवाला एजंटला दिल्लीतून अटक

delhi police special cell arrested a hawala operator mohammad yasin

देशभरात दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. यात आता दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जम्मू काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत हवाला एजंटला अटक केली आहे. दिल्लीतील तुर्कमान गेट येथून या एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मोहम्मद यासीन असं या एजंटचे नाव असून तो दिल्लीत कपडा व्यापारी म्हणून काम करतो.

लष्कर – ए- तोयब्बा आणि अल बद्र यांसारख्या दहशतवादी संघटनांना मोहम्मद यासीन पैसे पुरवण्याचा काम करत होता. यात त्याने काश्मीरमधील एका दहशतवाद्याला 10 लाख रुपये पाठवले हे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याची माहिती उघड झाली. मीना बाजार परिसरात एक हवाला एजंट काम करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.

या महितीच्या आधारे एका विशेष पथकाची स्थापन करत शोध मोहिम राबवण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. यासीन हा मीना बाजार परिसरात कपडा व्यापारी म्हणून काम करत होता. कापड व्यवसायाच्या नावाखाली तो परदेशातून येणारा पैसा जम्मू कश्मीरला पाठवायचा.

पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या मोठ्या हवाला रॅकेटचा तो एक सदस्य होता. काही दिवसांपूर्वीच यासीनला हवालाच्या माध्यमातून 24 लाख मिळाले होते. त्यातील 17 लाख रुपये त्यांने जम्मू-कश्मीरला पाठवले. याआधी त्यानं 10 लाख रुपये अब्दुल हामिद नावाच्या दहशतवाद्याला पाठवले होते. याप्रकरणाची कसून चौकशी आता तपास यंत्रणांकडून केली जात आहे.