घरताज्या घडामोडी'रस्ता सुरक्षा मोहिमे'साठी दिल्ली पोलिसांनी घेतला पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा आधार

‘रस्ता सुरक्षा मोहिमे’साठी दिल्ली पोलिसांनी घेतला पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा आधार

Subscribe

मागील अनेक महिन्यांपासून देशभरातील पोलीस यंत्रणा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा वापर करत जनजागृती करत आहे. वेगवेगळ्या मोहिमांसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या व्हिडीओचा वापर करून त्याद्वारे सामाजिक संदेश दिला जात आहे.

मागील अनेक महिन्यांपासून देशभरातील पोलीस यंत्रणा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा वापर करत जनजागृती करत आहे. वेगवेगळ्या मोहिमांसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या व्हिडीओचा वापर करून त्याद्वारे सामाजिक संदेश दिला जात आहे. अशातच दिल्ली पोलीसांनी ‘रस्ता सुरक्षा मोहिमे’ पाकिस्तानच्या खेळाडूंना सोडलेल्या कॅचचा व्हिडीओ वापरून जनजागृती केली आहे. (Delhi police use video of Pakistan missed catch in Asia Cup 2022 final for road safety campaign)

या व्हायरल व्हिडिओमध्ये आशिया चषक 2022 मधील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानते क्षेत्ररक्षक शादाब खान आणि आसिफ अली हे दोघे श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने मारलेला चेंडू पकडण्यासाठी एकत्र धाव घेतात. मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न केल्यावर हे दोघे एकमेकांना आधळतात. त्यामुळे क्षेत्ररक्षकांचा कॅच चुकतो, परिणामी श्रीलंकेने षटकार ठोकला, असे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

या व्हिडीओला दिल्ली पोलिसांनी ‘मेरा नाम जोकर’ या 1970 च्या चित्रपटातील “ए भाई जरा देख के चलो” हे लोकप्रिय गाणे वापरत. रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती केली आहे. हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी शेअर केल्यानंतर अनेकांनी या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. युजर्सनी अशा जनजागृती क्लिपमागील सर्जनशील बुद्धीचे कौतुक केले आहे. “हे हँडल हाताळणाऱ्या व्यक्तीला, तू रॉक, सुपर आहेस,” असे एक युजर म्हणाला. काहींनी व्हिडिओचा किती आनंद घेतला हे दाखवण्यासाठी मीम्सही पोस्ट केले. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले, “धीर धरा.” तसेच, तिसऱ्या युजरने लिहिले, “सोयीस्करपणे, मागे एक कार देखील आहे. तपशीलांसाठी चांगली नजर”

सोशल मीडियावर एखादा फोटो शेअर केल्यास व्हायरल होण्यास अधिक वेळ लागत नाही. त्यामुळे अनेकजण सोशल मीडियाचा अतिशय सकारात्मक पद्धतीने वापर करत असतात. मग सोशल मीडिया युजर्सदेखील त्याला भरभरून प्रतिसाद देतात. याच पद्धतीचा मागील अनेक वर्ष पोलिसही वापर करत आहेत. देशातील विविध राज्यातील पोलीस त्यांच्या विभागातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित प्रसिद्ध व्हिडीओचा वापर करत जनजागृती करतात. जयपूर वाहतूक पोलिसांनी एकदा रस्ता सुरक्षा मोहिमेसाठी जसप्रीत बुमराहची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 अंतिम नो-बॉल इमेज वापरली होती.

- Advertisement -

हेही वाचा – सुरक्षेचे कारण देत गुजरात पोलिसांना मला सर्वसामान्यांमध्ये जाण्यापासून रोखायचे होते : केजरीवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -