Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल गांधींसाठी काय पण! 'या' महिलेने इमारतच त्यांच्या नावावर केली

राहुल गांधींसाठी काय पण! ‘या’ महिलेने इमारतच त्यांच्या नावावर केली

Subscribe

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता त्यांना त्यांचा बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली आहे. या नोटिशीनंतर काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींसाठी एक मोहीम सुरू केलीय.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता त्यांना त्यांचा बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली आहे. या नोटिशीनंतर काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींसाठी एक मोहीम सुरू केलीय. कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या घराची ऑफर देण्यास सुरूवात केली आहे. भोपाळमध्ये काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या घराबाहेरील नावाच्या पाट्या बदलल्या. दिल्ली काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्या राजकुमारी गुप्ता यांनी त्यांचं चार मजल्याचं घर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केलं आहे.

दिल्लीतील रहिवासी असलेल्या राजकुमारी गुप्ता यांनी दिल्लीतील मंगोलपुरी इथल्या ४ मजली घराचे नाव राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानं त्यांचं अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली होती. राहुल गांधींना १२, तुघलक लेन येथील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी सरकारला पत्र लिहून सांगितले होते की, ते चौथ्या कार्यकाळापासून 12, तुघलक रोड येथील निवासस्थानी राहत आहेत आणि येथील लोकांसोबत त्यांच्या अनेक सुखद आठवणी आहेत. त्या आठवणी सोबत घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा आहे. पत्राद्वारे दिलेल्या उत्तरात राहुल गांधी यांनी वेळप्रसंगी घर रिकामे करणार असल्याचे म्हटले आहे.

याआधी एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी कर्नाटकातील वायनाडमधून खासदार होते.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. दिग्विजय सिंह यांच्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ही मोहीम सुरू केली. भोपाळमध्ये काँग्रेस नेत्यांनी घराबाहेरील नावाच्या पाट्या बदलण्यास सुरूवात केली. त्यावर ‘माझे घर राहुलचे घर’ असे लिहिले आहे. नोटीसनंतर काँग्रेस नेते मध्य प्रदेशात प्रचार करत आहेत. प्रचाराचा एक भाग म्हणून काँग्रेस नेते आपल्या घरावर ‘मेरा घर राहुल गांधी का घर’ चे बॅनर पोस्टर लावत आहेत. इतकंच नव्हे तर ते राहुल गांधींना राहण्यासाठी घरही देऊ करत आहे.

राजधानी भोपाळमध्ये काँग्रेस नेते रवींद्र साहू झुमरवाला यांनी त्यांच्या घराच्या नावाची पाटी बदलून राहुल गांधींच्या नावाची पाटी लावली. घराची ऑफर देताना राहुल गांधी त्यांना पाहिजे तेव्हा येऊ शकतात आणि राहू शकतात, असंही ते म्हणाले.

- Advertisment -