Homeदेश-विदेशDelhi Suicide Case : बंगळुरूनंतर दिल्लीतही 'अतुल सुभाष', पत्नीच्या त्रासाला वैतागून पतीची...

Delhi Suicide Case : बंगळुरूनंतर दिल्लीतही ‘अतुल सुभाष’, पत्नीच्या त्रासाला वैतागून पतीची आत्महत्या

Subscribe

बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या 34 वर्षाच्या अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची घटना 10 डिसेंबर, 2024 ला घडली. अगदी अशीच घटना आता दिल्लीत घडल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या 34 वर्षाच्या अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची घटना 10 डिसेंबर, 2024 ला घडली. पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून अतुल यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 81 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून 24 पानांची सुसाइड नोट लिहिली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. तर फक्त पुरुषच महिलांचे मानसिक खच्चीकरण करत नाही तर महिलांकडूनही पुरुषांचे मानसिक खच्चीकरण होते, अशी माहिती समोर आली. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून या घटनेतील अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई आणि भाऊ तिघेही तुरुंगात आहेत. मात्र, आता या घटनेच्या महिन्याभरातच नवी दिल्लीतही अशीच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. (Delhi Suicide Case Husband suicide due to wife trouble, this case is similar to Atul Subhash incident)

मिळालेल्या माहितीनुसार, ज्याप्रमाणे इंजिनिअर अतुल सुभाषला त्याच्या पत्नीकडून त्रास देण्यात आला, त्याचप्रमाणे दिल्लीतील घटनेतही पुनीत खुराना नामक व्यक्तीला त्याची पत्नी मनिका पाहावा हिने त्रास दिला. ज्यामुळे वैतागलेल्या पुनितने पंख्याच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दिल्लीतील कल्याण विहार येथील मॉडेल टाऊन परिसरात ही घटना घडली. मंगळवारी (ता. 31 डिसेंबर 2024) संध्याकाळी पुनीत याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पुनीत यांचे दिल्लीतील प्रसिद्ध कॅफेचे मालक होते.

या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, पुनीत आणि मनिकाचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून दोघेही वेगळे राहात होते. लग्नाच्या वर्षभर पुनीत आणि त्याची पत्नी मनिका यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, काही काळानंतर छोट्या छोट्या कारणांवरून या दोघांमध्ये खटके उडायला लागले होते. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती. घटस्फोटातील अटींमध्ये मनिकाने बदल केल्याने यांच्यामधील वाद वाढला होता. तर हे पती-पत्नी मिळून एक कॅफे चालवत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा… Lucknow Crime : नववर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हादरले, हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

परंतु, आता मात्र नववर्षाच्या मध्यरात्री मनिका आणि पुनीतमध्ये फोनवर भांडण झाले. यावेळी तिने तू खरंच आत्महत्या करून दाखव आणि इतर गोष्टी बोलल्या. परंतु, तुला काय हवे आहे? मला फक्त इतकं सांग अशी विचारणा पुनीतने फोनवरून मनिकाला केली. मात्र, मी आता काही बोलणार नाही, तुझ्यात हिंमत असेल तर सकाळी समोर ये, मग मी तुला सर्व सांगते, असे मनिकाकडून सांगण्यात आले. रात्री 03 वाजता झालेल्या या भांडणानंतर पत्नीच्या जाचाला वैतागलेल्या पुनीत खुराना याने आत्महत्या केल्या. परंतु, त्याने त्याआधीच अतुल सुभाष यांनी ज्याप्रमाणे व्हिडीओ बनवला होता. त्याचप्रमाणे पुनीत खुरानाने 54 मिनिटांचा व्हिडीओ बनवलाअसल्याची माहिती घरच्यांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. परंतु, या घटनेमुळे पती-पत्नी यांच्यातील वाद आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.