घरताज्या घडामोडीभारतात असताना होते 'निगेटिव्ह' वुहानला जाताच झाले 'पॉझिटिव्ह'

भारतात असताना होते ‘निगेटिव्ह’ वुहानला जाताच झाले ‘पॉझिटिव्ह’

Subscribe

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत चीनमधील वुहानमध्ये गेलेले एअर इंडिया विमानातील १९ भारतीय कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३० ऑक्टोबरला वुहान पोहोचलेल्या या विमानामधील १९ प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्यात आली. त्यादरम्यान हे १९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सर्वांना स्थानिक रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, अलीकडच्या महिन्यांत भारतातून चीनकडे जाणारे हे सहावे विमान आहे. तर वुहानसाठी हे पहिली विमान होते. वुहानमुळे संपूर्ण जगात कोरोना व्हायरस पसरला आहे. दरम्यान या विमानात २७७ प्रवासी प्रवास करत होते. ज्यामध्ये १९ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३९ जणांच्या चाचणीत अँटीबॉडीज सापडले आहेत.

- Advertisement -

या विमानातून प्रवास होण्यापूर्वी पहिल्यांदा सर्व भारतीय प्रवाशांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. असे होऊनही चीनमध्ये काही प्रवासी पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोरोना पॉझिटिव्ह १९ भारतीयांशिवाय ३९ अन्य प्रवाशांमध्ये अँटीबॉडीज सापडले आहेत. विमानात प्रवास करणाऱ्या सर्व भारतीयांना दोन वेळा कोरोना चाचणीतून जावे लागले आहेत.

यादरम्यान भारत सरकारने चीनसाठी १३ नोव्हेंबरपासून चार विमान उड्डाणाचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३, २० आणि २७ नोव्हेंबरला विमान उड्डाण होणार आहेत, ४ उड्डाण ४ डिसेंबरला उड्डाण करेल. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये भारताने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी घातली होती. त्यानंतर सरकारने मे मध्ये वंदे भारत मिशन सुरू केले. ज्या अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी विशेष विमान चालविण्यात आले. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत २० लाखांहून अधिक भारतीयांना परत आणले गेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -