घरदेश-विदेशदिल्लीचं झालं गॅस चेंबर; प्रदूषणामुळे 'हेल्थ इमर्जन्सी'

दिल्लीचं झालं गॅस चेंबर; प्रदूषणामुळे ‘हेल्थ इमर्जन्सी’

Subscribe

दिल्लीत प्रदूषणामुळे हवेची अवस्था फारच खराब झाली आहे आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून पब्लिक हेल्थ इमर्जन्सी जाहीर केलेली आहे.

जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिवसेंदिवस दिल्लीतल्या हवेची अवस्था फार वाईट होत चालली असून या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर फार परिणाम होत आहे. तरी शुक्रवारी आणि शनिवारी सर्वात जास्त प्रदूषण झालं असल्याचं प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून कळण्यात आलं आहे. राजधानीत प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढली असल्यानं, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने (ईपीसीए) दिल्ली-एनसीआरमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

दिल्ली, गाझियाबाद, गुरुग्राम, नोएडा आणि फरीदाबाद या परीसरात ५ नोव्हंबर पर्यंत बांधकामावर बंदी लावली आहे. हिवाळ्यात देखील फटाके फोडण्यावर बंदी लावलेली आहे. प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी ही सगळी पाऊलं उचल्ली जात आहेत. नागरिक आणि शाळकरी विद्यार्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ५० लाखांपेक्षा जास्त मास्क वितरीत करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

- Advertisement -

या वितरण मोहिमेचे प्रथम उद्दिष्ट राजधानीतील सरकारी आणि खासगी अशा दोन्ही शाळांतील विद्यार्थी आहेत.

- Advertisement -

‘दिल्ली सरकार ५० लाखांपेक्षा जास्त मास्क सरकारी आणि खासगी शाळेतील मुलांना १ नोव्हेंबर या दिवशी विनामूल्य वाटणार आहे. सरकार ५० लाख विनामूल्य एन ९५ प्रदूषण विरोधी मास्क १६ लाख विद्यार्थ्यांना वाटणार आहे.’ – अरविंद केजरीवाल

सध्याच्या परिस्थितीत रोजच्या वापरासाठी एन ९५ मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जातोय, कारण हा मास्क नाक आणि तोंड झाकून ठेवतो आणि ९५ टक्के पर्यंत प्रदूषण फिल्टर करतो. सध्याच्या खराब हवामानामुळे दिल्ली सरकारनं शाळांना ५ नोव्हेंबरपर्यंतची सूट्टी जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -