घरदेश-विदेशदिल्ली हिंसाचाराचे संसदेत पडसाद

दिल्ली हिंसाचाराचे संसदेत पडसाद

Subscribe

सत्तारुढ भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. सभागृहांचे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

दिल्लीत सीएए कायद्यावरुन उसळलेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद दोन्ही सभागृहात उमटले. दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांनी उपस्थित केला. त्यानंतर गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी सत्तारुढ भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. सभागृहातील गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ ते ३ मार्च एप्रिलपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत पार पडला.

- Advertisement -

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला १९८४च्या दंगलीची आठवण करुन दिली. प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला ज्यांची सत्ता असताना १९८४ ला दंगल घडली ते आज सभागृहात गोंधळ घालत आहेत आणि या गोष्टीचा मी निषेध करतो, असा टोला लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; १५ मार्चपासून निर्यातबंदी उठणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -