दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा ३४ वर

दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांना आपले प्राण गमावले लागले असून दोनशेहून अधिकजण जखमी झाले आहेत.

ib ministry stay on telecast of two kerala channels for reporting of delhi violence
दिल्ली हिंसाचार.

दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांना आपले प्राण गमावले आहेत. तर दोनशेहून अधिकजण जखमी झाले आहेत. हा हिंसाचार आता थांबला असून या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, या हिंसाचारामध्ये ३४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले आहेत. दरम्यान, प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत कि नाही यावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रपती रामनात कोविंद यांची भेट देखील घेतली आहे.

दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली हायकोर्टात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या खटल्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एम. के. आचार्य, अमित महाजन आणि रजत नायर यांना दिल्ली पोलिसांचे वकील म्हणून नियुक्त केले आहे.

केजरीवालांनी बोलावली बैठक

दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, कैलाश गहलोत आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्याबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग देखील त्यांच्यासोबत होते.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार रोखण्यात अपयश, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी