घरताज्या घडामोडीCoronavirus: दिल्लीत कोरोना नियंत्रणात; वीकेंड कर्फ्यूसह दुकाने खुली ठेवण्याचा Odd-Even नियम हटवला

Coronavirus: दिल्लीत कोरोना नियंत्रणात; वीकेंड कर्फ्यूसह दुकाने खुली ठेवण्याचा Odd-Even नियम हटवला

Subscribe

जरी दिल्लीतील विकेंड कर्फ्यू हटवण्यात आला असला तरी नाईट कर्फ्यू रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत कायम असणार आहे.

दिल्लीत सध्या कोरोना रुग्णांची नोंद कमी प्रमाणात होत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत दैनंदिन नव्या कोरोनाबाधित संख्येत २० हजारांनी वाढ होत होती. मात्र आता दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होऊन ७ ते ८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे आता दिल्लीतील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने काही निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आता वीकेंड कर्फ्यूसह दुकाने खुली ठेवण्याचा ऑड-इव्हन नियम हटवण्यात आला आहे. याशिवाय आता ५० टक्के क्षमेतने चित्रपटगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले होते की, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आला आहे. आज दिल्लीत ५ हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली असून पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण झाली आहे. १० टक्के दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये घसरण होत असल्यामुळे दिल्लीतील निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात होती. अशातच दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) गुरुवारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. वीकेंड कर्फ्यू हटवण्यासह काही निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जरी दिल्लीतील विकेंड कर्फ्यू हटवण्यात आला असला तरी नाईट कर्फ्यू रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत कायम असणार आहे.

दिल्लीतील कोणत्या निर्बंधात बदल आणि कोणते निर्बंध कायम? 

  • दिल्लीतील वीकेंड कर्फ्यू हटवला आहे. जो शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत होता.
  • लग्न समारंभासाठी २०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत १५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती.
  • दिल्लीतील आता चित्रपटगृह उघडणार आहेत. ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार.
  • नाईट कर्फ्यू कायम राहणार.

हेही वाचा – Covid-19 Pandemic: कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर पहिल्यांदाच जगात एका आठवड्यात उच्चांकी रुग्णवाढ – WHO


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -