प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; कोरोनाने मृत्यू झाल्याचा केला बनाव

पतीचा खून करुन कोरोनाने मृत्यू झाल्याचा कांगावा करणाऱ्या पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Grandfather and uncle committed the murder; Unravel the challenging crime
Grandfather and uncle committed the murder; Unravel the challenging crime

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कदायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. मात्र, हत्येनंतर कुणालाच संशय येऊ नये, म्हणून आपल्या पतीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा कांगावा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

नेमके काय घडेल?

इशान्य दिल्लीतील अशोक विहार येथे राहणाऱ्या अनिता या महिलेचे तिच्या पेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले होते. आपल्या मर्जीने लग्न न झाल्याने अनिता खूश नव्हती. तसेच अनिताचे संजय नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे तिने तिच्या पतीचा कट काढण्याचे ठरवले. दरम्यान, २ मे रोजी संजयच्या मदतीने अनिताने शरदचा गळा घोटला आणि त्याला ठार केले. त्यानंतर शेजाऱ्यांना तिने आपल्या पतीचा कोरोनामुळे श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर अनिताने आणि संजयने मिळून शरदच्या अंत्यसंस्काराची देखील तयारी केली. मात्र, अनिताच्या वागण्यातून शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला.

दरम्यान, अनिता आणि संजय शरदचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले आणि मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवला. त्यानंतर दोघांकडे देखील चौकशी करण्यात आली. मात्र, दोघेही प्लॅननुसार आपल्या बनावावर ठाम राहिले. मात्र, शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर सत्य बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘या’ ६ वॅक्सीन लस कोरोनावर करणार मात