Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी देशभरात कॅबमध्ये सामान विसरण्याच्या यादीत दिल्लीकर अग्रेसर

देशभरात कॅबमध्ये सामान विसरण्याच्या यादीत दिल्लीकर अग्रेसर

Subscribe

रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करताना बऱ्याचदा प्रवासी आपले सामान गाडीतच विसरतात. अनेकदा तक्रार केल्यानंतर सामन मिळते. मात्र असे असले तरी आपले सामान विसरण्याच्या बाबतीत देशातील प्रमुख शहरांमध्ये दिल्लीकरांचा क्रमांक वरचा आहे.

रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करताना बऱ्याचदा प्रवासी आपले सामान गाडीतच विसरतात. अनेकदा तक्रार केल्यानंतर सामन मिळते. मात्र असे असले तरी आपले सामान विसरण्याच्या बाबतीत देशातील प्रमुख शहरांमध्ये दिल्लीकरांचा क्रमांक वरचा आहे. देशातील आघाडीची अॅप-आधारित कॅब सेवा प्रदाता उबरने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. (delhiites are ahead of the important cities of the country in terms of forgetting luggage in the cab)

उबरच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील नागरिक कॅबमध्ये सामान विसरण्याच्या यादीत देशात आघाडीवर आहेत. त्यानंतर मुंबईकरही मागील दोन वर्षांपासून सामन विसरण्यात अग्रेसर आहेत. हैदराबादने प्रथमच सर्वाधिक विसरणाऱ्या चार शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवला आहे. तसेच, बेंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

प्रवास संपल्यानंतर प्रवासी फोन, बॅग, पाकीट आणि कपडे यांसारख्या वस्तू कॅबमध्ये विसरतात. तसेच पाण्याची बाटली, चाव्या, चष्मा आणि दागिनेही कॅबमध्ये विसरतात. झाडू, कॉलेजचे अॅडमिट कार्ड आणि बाळाचे स्ट्रोलरही मागे राहिले नाहीत. एका प्रवाशाने तर त्याची चालण्याची काठी, एक मोठा स्क्रीन टीव्ही, कॅबमध्ये सोडला. कॅबमध्ये विसरण्याच्या यादीत वेस्टर्न कमोडचाही समावेश आहे.

सर्वाधिक 10 विसरलेल्या वस्तू

- Advertisement -

फोन, लॅपटॉप बॅग, वॉलेट, कपडे, हेडफोन, चष्मा/सनग्लासेस, चाव्या, दागिने, घड्याळ. तारखा लोक सर्वात जास्त विसरतात. विशेष म्हणजे आठवड्याचे शेवटचे तीन दिवशी म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी प्रवासी आपले सामना कॅबमध्ये विसरतात. तसेच, संध्याकाळी 6 ते रात्री 8 या कालावधीत प्रवासी सर्वाधिक सामान विसरत असतात.


हेही वाचा – पाकिस्तानच्या दिवाळखोरीला दहशतवाद जबाबदार, देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

- Advertisment -