घरदेश-विदेशदिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, ऑक्सिजन कंसन्ट्रेटर बँकेची अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, ऑक्सिजन कंसन्ट्रेटर बँकेची अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाने कहर केला होता मात्र, दिल्लीतील कोरोनाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रित असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीतील कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी असे सांगितले की, दिल्लीमध्ये कोरोना बाधितांच्या आकड्यात घट झाली असूनन गेल्या २४ तासांत साधारण ६ हजार ५०० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, संसर्गाचे प्रमाण देखील कमी होत असून सध्या ते १२ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सद्यस्थिती बघता आरोग्य व्यवस्थेविषयी चर्चा करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, शुक्रवारी दिल्लीत ५०० आयसीयू बेड तयार करण्यात आले असून काही दिवसांपूर्वी ५०० आयसीयू बेड तयार करण्यात आले होते. हे हजार आयसीयू बेड केवळ १५ दिवसात तयार करण्याचे सर्व श्रेय डॉक्टर आणि अभियंता यांना जाते, असेही केजरीवाल म्हणाले. यासाठी त्यांनी संपूर्ण दिल्लीतील डॉक्टर आणि अभियंत्यांचे आभारही मानले आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दिल्लीत ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता दिल्ली सरकारने ऑक्सिजन कंसन्ट्रेटर बँक तयार करण्याची घोषणा शनिवारी केली. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीत आजपासून ऑक्सिजन कंसन्ट्रेटर बँक सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा प्रत्येक जिल्ह्यात २०० ऑक्सिजन कंसन्ट्रेटर बँक तयार करण्यात येणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, कोणाला कोरोना संसर्ग झाल्यास त्या रूग्णाला सुरूवातीलाच जर त्यांना ऑक्सिजन पुरविला गेला तर त्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. परंतु रूग्णास वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध झालं नाही तर रुग्णाची अवस्था गंभीर होऊन अशा परिस्थितीत अनेक रुग्णांचे प्राण देखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -