घरCORONA UPDATE'या' कारणांमुळे दिल्लीचा निजामुद्दीन भाग कोरोनाचं केंद्र बनलं

‘या’ कारणांमुळे दिल्लीचा निजामुद्दीन भाग कोरोनाचं केंद्र बनलं

Subscribe

दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील २००हून अधिक जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत.

निजामुद्दीन येथील मशिदीत १ ते १५ मार्च दरम्यानच्या काळात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या निजामुद्दीन भागात अनेक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आता २००हून अधिक जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे दिल्लीचा निजामुद्दीन भाग कोरोनाचं केंद्र बनले आहे. कोरोना संशयितांना दिल्लीतील वेगवेगळ्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली पोलिसांनी सर्व परिसर सील केला आहे. मात्र, दिल्लीचा निजामुद्दीन भाग कोरोनाचं केंद्र बनले याची कारणे आता समोर येत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक: कोरोनाच्या उद्रेकानंतर मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ

- Advertisement -

हे आहेत प्रमुख १० मुद्दे

१. अहवालानुसार, १ ते १५ मार्च दरम्यान इंडोनेशिया आणि मलेशियासारख्या देशातील २,००० हून अधिक प्रतिनिधी दिल्लीच्या निजामुद्दीन पश्चिम येथील तबलीघी जमात कार्यक्रमात उपस्थित होते.

२. तबलीघी जमातच्या मुख्यालयात असलेले कमीतकमी ३७ लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यात रविवारपासून २४ जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

- Advertisement -

३. मार्काझ येथे झालेल्या बैठकीला जे उपस्थित होते त्या सर्वांना सोमवारी रात्री कोरोना व्हायरस चाचणीसाठी लोक नायक रुग्णालयात पाठविण्यात आले. किमान १०० लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. मंगळवारी अहवाल येण्याची शक्यता आहे.

४. तबलीघी जमात कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ७ जणांचा सोमवारी हैदराबादमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तर श्रीनगरमध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला.

५. मंडळात असलेले २,००० लोक सहा मजल्यावरील शयनगृहात राहिले. यामध्ये २५० पेक्षा जास्त परदेशी होते. ते सामुदायिक स्वयंपाकघरात शिजवलेले जेवण जेवले.

६. दिल्ली पोलिस, सीआरपीएफचे जवान आणि वैद्यकीय पथक रविवारी रात्री घटनास्थळी जाऊन सर्व परिसर सील केला.

७. कॉनटॅक्ट नंबर ट्रेस केल्यानंतर जमातीला आलेले लोक बिहार, तेलंगणा, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांत गेल्याचे समजले आहे.

८. मार्कझ, ज्याला बांगलेवाली मस्जिद म्हणून ओळखले जाते. ही सहा मजली इमारत आहे ज्यामध्ये २,००० लोक राहू शकतात. तिची भिंत निजामुद्दीन पोलिस स्टेशनला असून ती ख्वाजा निजामुद्दीन औलियाच्या प्रसिद्ध देवस्थानला लागून आहे. २५,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भाग निजामुद्दीन मशिदीला जोडलेला आहे.

९. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२ मार्चपासून (जनतेच्या कर्फ्यूच्या दिवसापासून) पोलिस दल मशिदीबाहेर उभे आहे आणि लोकांना त्या ठिकाणी जमण्यास रोखत होते. २२ मार्चपर्यंत परदेशी व इतर राज्यातील लोक मशिदीला भेट देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१०. पोलिस सहआयुक्त (दक्षिण श्रेणी) देवेश श्रीवास्तव म्हणाले की, निझामुद्दीनमधील लोकांची तपासणी करणार्‍या आणि विशेषत: मशिदी संकुलातील लोकांना अलग ठेवण्यासाठी पाठवत असलेल्या जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिस मदत करत आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -