घरताज्या घडामोडीजगभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार कायम; 'डेल'मध्येही हजारो जण गमावणार रोजगार

जगभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार कायम; ‘डेल’मध्येही हजारो जण गमावणार रोजगार

Subscribe

जगभरात आलेल्या मंदीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. मंदीच्या भीतीने मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरात आलेल्या मंदीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. मंदीच्या भीतीने मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच डेलकडून जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के कर्मचारी कपातीची घोषणा कंपनीने केली आहे. (Dell Technologies Layoff Dell To Slash Over 6600 Jobs)

नुकताच गूगलने १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डेलकडून जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के कर्मचारी कपातीची घोषणा कंपनीने केली आहे. यामुळे जवळपास ६ हजार ६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. कंपनी बाजारातील परिस्थिती अनुभवत असून, दिवसेंदिवस यात अधिक अनिश्चितता येत असल्याचे कंपनीचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे पाच टक्के कर्मचारी कपात करणार आहे. यापूर्वी कंपनीने २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात कर्मचारी कपातीची घोषणा केली होती.

- Advertisement -

अनेक दिग्गज कंपन्यांनंतर आता स्टार्टअप्सनीही आपल्या खर्चात कपात आणि नफा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे.

मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली कर्मचारी कपात थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकताच गूगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने 12000 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मेडिकल टेक निर्माता कंपनी फिलिप्सने सोमवारी जगभरातील 6000 नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या ताज्या नुकसानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स यांनी एका निवेदनात 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांची सध्या आणखी कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – गूगलनंतर फिलिप्समध्ये होणार मोठी नोकरकपात; ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांचा बुडणार रोजगार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -