Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Delta Variant: अल्फापेक्षा ६० टक्के अधिक संसर्गजन्य; भारत, ब्रिटनसह अमेरिकेसाठी ठरतोय धोकादायक...

Delta Variant: अल्फापेक्षा ६० टक्के अधिक संसर्गजन्य; भारत, ब्रिटनसह अमेरिकेसाठी ठरतोय धोकादायक स्ट्रेन

Related Story

- Advertisement -

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला असून आता कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट देशाची चिंता अधिक वाढवत आहे. जगातील सर्वात सक्रिय कोरोनाव्हायरस स्ट्रेनपैकी डेल्टा व्हेरिएंट (बी.1.617.2) सर्वाधिक संसर्गजन्य असल्याचे प्रथम भारतात दिसून आले. डब्ल्यूएचओने देखील या चार व्हेरिएंटच्या डेल्टाबद्दल अधिक चिंता व्यक्त केली होती. यासह भारतात दुसऱ्या लाटेत याचा कहर वाढताना दिसला. यामुळे ब्रिटन आणि अमेरिकेत भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी अमेरिकेत पसरलेल्या अल्फाच्या स्ट्रेनपेक्षा डेल्टा व्हेरिएंट ६० टक्के जास्त संक्रामक आहे.

अमेरिकेत डेल्टाचे ६ टक्के लोकं संक्रमित

चिनी वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मते, डेल्टा रुग्णांची प्रकृती वेगाने खालावत आहे. डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर त्या रूग्णाची रिकव्हरी खूपच मंद असते. दरम्यान, जेव्हा त्याची प्रकृती ढासळते तेव्हा त्याचा जीव जाण्याचा धोका देखील सर्वाधिक असतो. अमेरिकेचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्टीव्ह डिसिसीजचे संचालक डॉ. एंथोनी फोसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिकेत डेल्टाचा या स्ट्रेनचे ६ टक्के लोकं संक्रमित आहेत. मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मायकेल ऑस्टरहोल्म यांच्या मते, डेल्टा अधिक संसर्गजन्य असल्याने अल्फाचा स्ट्रेन कमी असल्याचे दिसून येते.

ब्रिटनमधील लोकांच्या वाहतुकीवर बंदी

- Advertisement -

युरोपमध्ये डेल्टा संसर्गामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्याच्या वाढत्या संसर्गामुळे काही युरोपियन देशांनी ब्रिटनमधील लोकांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. चीनमधील डेल्टा संकट हे दक्षिण-पूर्वेस असलेल्या गुआंगझाउ शहराभोवती केंद्रित आहे. येथे सरकारने काही निर्बंध लादले आहेत. अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटची रूग्ण दर दोन आठवड्यांनी दुप्पट होत आहेत. जॉर्जिया, अलाबामा, वेस्ट व्हर्जिनिया, मिसिसिप्पी यासारख्या अमेरिकेत लसीकरण कमी झाले आहे. म्हणून खबरदारी घेण्याची गरज सांगितली जात आहे. जर ती हाताळली गेली नाही तर २०२० मध्ये इंग्लंडमधील उद्भवलेल्या परिस्थितीसारखा धोका असल्याचे परिस्थिती निर्माण होण्याती शक्यता वर्तवली जात आहे.


WTC Final : अगदी महत्त्वाचा सामना इंग्लंडमध्ये नकोच! पावसामुळे माजी क्रिकेटपटू भडकला

- Advertisement -