घरदेश-विदेशमाय-लेकीने उडवले विमान, प्रवाशांनी केले कौतुक

माय-लेकीने उडवले विमान, प्रवाशांनी केले कौतुक

Subscribe

न्यू यॉर्कमध्ये डेल्टा फ्लाइट या प्रवासी विमानाचे उड्डान माय-लेकींनी केली आहे. या दोघी पायलट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे. ५० हजार लोकांनी या फोटोला लाईक केले तर १६ हजार लोकांनी या ट्विटला रिट्विट केले आहे.

विमान उडवणे हे मोठे जबाबदारीचे काम असते. हे जाबाबदारीचे काम करण्यासाठी एका पायलटला अनेक परिक्षा द्यावा लागतात. परिक्षेत पास होऊन पायलटचे योग्य प्रशिक्षण घ्यावे लागते. आपल्या मुलाला मोठे होऊन काय बनवायचे याचा निर्णय पालक घेतात. अशाच एका आईने आपल्या मुलीला पायलट बनवले आहे. फक्त पायलट बनवले नाही तर या आईने मुलीसोबत विमान उडवले आहे.

माय लेकींनी उडवले विमान

बहुतेक वेळ विमानांंमध्ये एक वृद्ध पायलट आणि एका तरुण पायलटचे समीकरण बघायला मिळते. मात्र न्यु योर्क येथे चक्क माय-लेकींनी एक प्रवासी विमान उडवल्याची माहिती समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे अनेकांनी या महिलांचे कोतुक केले आहे. महिला पायलट व तिची मुलगी यांनी एकच विमान उडवले आहे. आपल्या आईच्या मार्गदर्शना अंतर्गत मुलीने विमान उडवले आहे. या मुलीची आई विमानाची मुख्य पायलट होती तर तिच्या मुलीने को पायलट म्हणून काम संभाळले. लॉस एंजेलीस येथून अटलांटिका दरम्यान या विमानाने प्रवाशांची वाहतूक केली.

- Advertisement -

सोशल मीडियावर झाले कौतुक

वेंडी रेक्सन असे या मुख्य पायलटचे नाव असून तिच्या मुलीचे नाव केली आहे. या दोघी माय लेकी आहे. लहानपणापासून केलीने आपल्या आईकडून पायलट बनायचे धडे गिरवले. आपली मुलगीही पायलट व्हावी असे स्वप्न वेंडीचे होते. त्यानुसार केलीने शिक्षण केले आणि सध्या ती पायलट म्हणून कार्यरत आहे. विमानातील प्रवाशांनाही ही गोष्ट ज्यावेळी समजली तेव्हा त्यांनीही त्याचे कौतुक केले. एका प्रवाशाने या दोघींचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -