घरताज्या घडामोडीनवं संकट! अमेरिकेप्रमाणे भारतातही आढळला डेल्टा प्लस सारखा AY.2 म्यूटेशन

नवं संकट! अमेरिकेप्रमाणे भारतातही आढळला डेल्टा प्लस सारखा AY.2 म्यूटेशन

Subscribe

अमेरिका आणि ब्रिटनप्रमाणेच डेल्टा व्हेरिएंटचे अधिक म्यूटेशन भारतातही आढळून आले आहे, परंतु केंद्र सरकार गेल्या २० दिवसांपासून या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती उघड केली नाही. आता शास्त्रज्ञांनी अधिकृतपणे असे सांगितले की, डेल्टा प्लस प्रमाणेच भारतातही एवाय.२ म्यूटेशनचे रूग्ण देखील आढळत आहेत. हे म्यूटेशन डेल्टा व्हेरियंटमध्ये देखील झाले. आतापर्यंत अमेरिकेत सर्वाधिक AY.2 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशातील ५ हून अधिक रुग्णांमध्ये एवाय.२ म्यूटेशन आढळले आहे. राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ही रूग्णे आढळल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे डबल म्यूटेशन आढळले होते. काही महिन्यांनंतर पुन्हा म्यूटेशन झाले, त्यानंतर डेल्टा आणि कप्पा व्हेरिएंट आढळून आले. डेल्टामध्ये दोन म्यूटेशन देखील झाले, आता त्यांत डेल्टा प्लस आणि आय २ म्यूटेशन समोर आले आहे. आता भारतात हे दोन्ही म्यूटेशन आढळले आहे. पुणे येथील एन.आय.व्ही.च्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात डेल्टा प्लस आणि एवाय .२ म्यूटेशन आढळले आहे. हे दोन्ही म्यूटेशन अतिशय गंभीर आहेत आणि त्याचा परिणाम अद्याप समोर आलेला नाही. अशी भीतीही आहे की जर देशात तिसरी लाट आली तर हा म्यूटेशन परस्थिती अधिक गंभीर निर्माण करू शकतो.

- Advertisement -

महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये AY.2 चे रूग्ण

आतापर्यंत, जीआयएसआयडी प्लॅटफॉर्मवर एवाय 2 प्रकाराची २५० पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये आढळला आहे. यापैकी जास्तीत जास्त २३९ नमुन्यांची माहिती अमेरिकेच्या राज्यांमधून देण्यात आली आहे. जीआयएसआयडी प्लॅटफॉर्म जागतिक स्तरावर सर्व देशांनी विकसित केले आहे. जेथे प्रत्येक देश नमुन्यांसह नवीन म्यूटेशनविषयी संपूर्ण माहिती देतो. आतापर्यंत भारतातून अशा चार रूग्णांविषयी माहिती देण्यात आली असून त्यामध्ये एवाय २. हा म्यूटेशन प्रकार सापडला आहे. हे चारही रूग्ण २ ते २१ मे दरम्यान समोर आले आहेत. ही रूग्ण राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे.

आतापर्यंत १२ पेक्षा जास्त राज्यात आढळला डेल्टा प्लस

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये डेल्टा प्लसची कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत, परंतु गेल्या आठवड्यातच येथे रुग्णांमध्ये त्याची उपस्थिती आढळली. आतापर्यंत ८० हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. डेल्टा प्लस आढळणाऱ्या राज्यांची संख्या वाढून आता ती १४  झाली आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -