घरताज्या घडामोडीDelta Variant: १२ राज्यांमध्ये आढळले डेल्टा व्हेरियंटचे ५६ रुग्ण - डॉ. वीके...

Delta Variant: १२ राज्यांमध्ये आढळले डेल्टा व्हेरियंटचे ५६ रुग्ण – डॉ. वीके पॉल

Subscribe

देशात अजूनही कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाची दुसरी लाट मंदावत असली तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार येणाऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयारी करत आहे. या तिसऱ्या लाटेचे कारण डेल्टा व्हेरियंट असल्याचे सांगितले जात आहे. सध्या भारतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. देशातील १२ राज्यांमध्ये ५६ डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी आज, शुक्रवारी दिली.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ७१ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ही रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. पण लाट केव्हा येईल, याबाबत माहिती नाही. दरम्यान देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के पार झाले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या शिगेला पोहोचल्याच्या दरम्यान देशातील जितके सक्रीय रुग्ण होते, त्यामध्ये ८६ टक्के कमी झाले आहेत.

देशात आज ४६ हजार ६१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ हजार ३८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४ लाख ५८ हजार २५१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३१२ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९५ लाख ४८ हजार ३०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ५ लाख ९ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात ३४ कोटी ७६ हजार २३२ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: लसीचा एक डोस कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतो?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -