घरताज्या घडामोडीCoronavirus: डेल्टा व्हेरियंटमुळे लोकांना दुप्पट वेगाने होतोय कोरोनाचा संसर्ग, अभ्यासातून नवा खुलासा

Coronavirus: डेल्टा व्हेरियंटमुळे लोकांना दुप्पट वेगाने होतोय कोरोनाचा संसर्ग, अभ्यासातून नवा खुलासा

Subscribe

देशात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. २ कोटी ९६ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संदर्भात केलेल्या एका अभ्यासानुसार, आतापर्यंत सर्वात धोकादायक व्हेरियंट डेल्टा आहे आणि तो लोकांना दुप्पट वेगाने संक्रमित करत आहे.

स्कॉटलँडमध्ये कोरोना व्हायरस केलेल्या अभ्यासात सांगितले की, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरियंटने सर्वात जास्त नुकसान पोहोचवले आहे. कोरोना लसीच्या माध्यमातून यावर नियंत्रण आणले जाऊ शकते. कारण लसीच्या दोन डोसमुळे शरीरात खूप मजबूत प्रतिकारशक्ती वाढत आहे. स्कॉटलँडमध्ये ५४ लाख लोकांवर केलेल्या हा अभ्यास द लँसेट पत्रिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

- Advertisement -

युनिव्हर्सिटी ऑफ स्टॅथक्लाइडच्या एक प्रोफेसर क्रिस रॉबर्टसन यांनी म्हटले आहे की, अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंटमुळे संसर्ग होण्याचा धोका दुप्पट आहे. तर अल्फा व्हेरियंटमुळे रुग्णालयात भरती होण्याचा धोका दुप्पट वाढतो. या नव्या अभ्यासानुसार, कोरोना लस अल्फा व्हेरियंट धोका कमी करताना दिसत आहे. लसीचे दोन डोस किंवा कोरोना पॉझिटिव्ह झाल्याच्या २८ दिवसांनंतर घेतलेला पहिला डोस ७० टक्के कार्यक्षम असल्याचे सिद्ध होत आहे.

सध्या जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी ७२ लाखांहून अधिक आहे. जगातील कोरोनाबाधित देशातील यादीत अमेरिका अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४३ लाखांहून अधिक आहे. या जागतिक यादीमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर असून आतापर्यंत २ कोटी ९६ लाखांहून अधिक भारतात रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भारतातील कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवरील इतर लसींपेक्षा Sputnik V अधिक प्रभावी, कंपनीचा दावा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -