Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Delta Plus Variant: डेल्टा व्हेरियंटने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळला ८५ देशांमध्ये -...

Delta Plus Variant: डेल्टा व्हेरियंटने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळला ८५ देशांमध्ये – WHO

गेल्या दोन आठवड्यात डेल्टा व्हेरियंटचा प्रकोप ११ देशांमध्ये झाला.

Related Story

- Advertisement -

संपूर्ण जगभरात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. आता कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट चिंता वाढवत आहे. आतापर्यंत ८५ देशांमध्ये डेल्टा व्हेरियंट पसरला असून सातत्याने त्याचा विस्तार होत आहे. त्यामुळे लवकरच हा इतर देशांमध्ये पसरू शकतो. जर डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमणाचा वेग असाच राहिला तर कोरोनाचा सर्वाधिक फैलाव होणार स्ट्रेन होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २२ जून रोजी पार पडलेल्या कोरोना संदर्भातील आठवड्यातील अपडेटमध्ये सांगितले की, जागतिक पातळीवर अल्फा व्हेरियंट १७० देशांमध्ये, बीटा व्हेरियंट ११९ देशांमध्ये, गामा व्हेरियंट ७१ देशांमध्ये आणि डेल्टा व्हेरियंट ८५ देशांमध्ये पसरला आहे. गेल्या दोन आठवड्यात डेल्टा व्हेरियंटचा प्रकोप ११ देशांमध्ये झाला आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने पुढे सांगितले की, चिंता वाढवणारे चार व्हेरियंटचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा अशी नावं असलेले हे व्हेरियंट व्यापक आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व क्षेत्रामध्ये आढळले आहेत. अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंट खूप वेगाने पसरणार आणि घातक आहे.

माहितीनुसार, भारतात गेल्या आठवड्यात (१४ ते २० जून २०२१) कोरोनाचे सर्वाधिक ४ लाख ४१ हजार ९७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. भारतात सर्वाधिक नवीन मृतांची नोंद झाली आहे. यादरम्यान १६ हजार ३२९ मृत्यू झाले होते.

- Advertisement -

दक्षिण-पूर्व अशिया क्षेत्रात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सहा लाखांहून नवीन प्रकरण आणि १९ हजारांहून नवीन मृत्यू झाले. दरम्यान गेल्याच्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये क्रमश: २१ टक्के आणि २६ टक्के कमी झाल्याचे दिसले. भारतातील कोरोना प्रकरणात घट झाल्यामुळे साप्ताहिक घटनांमध्ये आणि मृत्यूंमध्ये घटती प्रवृत्ती दिसून आली आहे.


हेही वाचा – Delta Plus Variant: डेल्टा प्लस व्हेरियंटची नेमकी लक्षणे काय? कसा कराल बचाव?


 

- Advertisement -