घरCORONA UPDATEकोरोनाचा Delta व्हेरिएंट जगभरात सर्वाधिक परिणामकारक ठरेल, WHO चा इशारा

कोरोनाचा Delta व्हेरिएंट जगभरात सर्वाधिक परिणामकारक ठरेल, WHO चा इशारा

Subscribe

डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या संवेदनशील ठिकाणी तात्काळ लसीकरण प्रक्रिया वाढवण्यात यावी, असा सल्ला देखील WHO ने दिला आहे.

कोरोनाशी (Covid19) झुंज देत असताना कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटमुळे ( Delta variant ) जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुप दिसून आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)  कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाचा Delta व्हेरिएंट जगभरात सर्वाधिक परिणामकारक ठरेल त्याचप्रमाणे काही दिवसात जगभरात तणाव वाढण्यामागे कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हे एक मुख्य कारण असेल, असा इशारा WHO ने दिला आहे. त्याचप्रमाणे डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या संवेदनशील ठिकाणी तात्काळ लसीकरण प्रक्रिया वाढवण्यात यावी, असा सल्ला देखील WHO ने दिला आहे. ( Delta variant of Corona will be most effective in world – WHO)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणांवर असेलला ताण प्रचंड वाढला आहे. अनेक देशांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, जगभरात अनेक ठिकाणी कमी किंवा कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशामध्ये कोरोना चाचणी दर फार कमी आहे. जगभरातील अनेक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत मात्र त्यांना कोरोनाची लागण कशी झाले हेच माहित नसते.

- Advertisement -

WHO च्या म्हणण्यानुसार, जगाल ७.७ बिलियन इतक्या अतिरिक्त फंडिंगची गरज नाही. WHOच्या म्हणण्यानुसार, २०२०च्या तुलनेत २०२१च्या पहिल्या ५ महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. जग आजही कोरोना महामारीशी संघर्ष करत आहे. काही देशांमध्ये लसीकरण होऊनही कोरोना संसर्गामळे लोकांचा मृत्यू होत आहे. अपूऱ्या कोरोना चाचण्या आणि अपुऱ्या लसीकरणामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे आरोग्य यंत्राणांवरचा ताणही वाढत चालला आहे.


हेही वाचा – sero survey: पंजाबमध्ये ५८% मुलांमध्ये Covid-19 विरोधात लढण्यासाठी Antibody

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -