Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात WHO चा इशारा, जागतिक स्तरावर तयार होणार सर्वात महत्त्वाचा कोरोना...

डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात WHO चा इशारा, जागतिक स्तरावर तयार होणार सर्वात महत्त्वाचा कोरोना स्ट्रेन!

Related Story

- Advertisement -

जागतिक स्तरावर कोरोना महामारीचा कहर अद्याप सरूच आहे. यासह कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगातील इतर काही देशात वेगाने संसर्ग पसरवण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने एक इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असे सांगितले की, डेल्टा व्हेरिएंट हा १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. ज्या प्रकारे हा वेगाने पसरताना दिसतोय आणि हा व्हेरिएंट लवकरच जागतिक स्तरावर सर्वात महत्वाचे कोरोना स्ट्रेन होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक आणि आग्नेय आशियातील प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी असे सांगितले की, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट इतरांपेक्षा वेगाने पसरत असल्याने ही एक अत्यंत चिंतेची बाब निर्माण झाली आहे.

- Advertisement -

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेस जबाबदार असलेला डेल्टा व्हेरिएंट त्याच व्हायरसच्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ४० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. यासह देशात दररोज नव्याने नोंद केल्या जाणाऱ्या रूग्णांपैकी ८० टक्के हे या व्हेरिएंटच्या संसर्गाने बाधित असल्याचे भारतीय सार्स-सीओव्ही -2 जेनोमिक्स कन्सोर्टियमचे सह-अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले. या व्हेरिएंटचा परिणाम झाल्याने देशातील बर्‍याच भागात दुसर्‍या लाटेचा कहर झाला आहे.त्यामुळे आणि दररोज कोरोना बाधितांची साधारण ४० हजार नवीन रूग्णांची नोंद केली जात आहेत.

जगातील कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट ब्रिटन आणि अमेरिकेसह १०० देशांमध्ये पसरला आहे. अल्फा व्हेरिएंट देखील ब्रिटनमध्ये खूप वेगाने पसरत असल्याचे सांगितले जात आहे. त्या नंतर, ब्रिटनच्या बर्‍याच भागात डेल्टा व्हेरिएंटने कहर केला. कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये म्यूटेशन झाल्याने डेल्टा व्हेरिएंट तयार झाला आहे. मानवी शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचण्यामुळे ते जलद प्रतिकृती तयार करते, ज्यामुळे अल्पावधीतच गंभीर स्वरूपात संसर्ग शरीरात पसरते. डेल्टा व्हेरिएंटमधील म्यूटेशननंतर डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार होत असल्याचे अरोरा यांनी सांगितले.


- Advertisement -