COVID-19 4th wave: कोरोनाची चौथी लाट येतेय; ७ राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटचा फैलाव, वाचा लक्षणे

deltacron covid 4th wave of india symptoms new coronavirus variant

जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत केसेस कमी होत असताच आता पुन्हा एकदा नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जसे-जसे कोरोनाचे निर्बंध हटवले जात होते, त्यामुळे कोरोना महामारी संपली असे समजले जात आहे. परंतु आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला असून जो कोरोनाच्या चौथ्या लाटेचे कारण ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने या रिकॉम्बिनेंट व्हेरिएंटबाबत म्हटले की, ‘ओमिक्रॉन आणि डेल्टा वेगाने पसरल्यामुळे ही स्थिती येणारच होती.’

कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे नाव डेल्टाक्रॉन असे आहे, जो ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटमुळे विकसित झाला आहे. माहितीनुसार, भारतात या व्हेरिएंटचे निदान झाले असून ७ राज्यांमध्ये यासंबंधित आढळलेल्या रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या ७ राज्यांमध्ये कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्लीचा समावेश आहे. अशात हा नवा व्हेरिएंट डेल्टाक्रॉन किती धोकादायक आहे? आणि याचे लक्षणे काय आहेत? हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

डेल्टाक्रॉन रिकॉम्बिनेंट व्हेरिएंट आहे, जो ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटसंबंधित आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये डेल्टाक्रॉन या नव्या व्हेरिएंटची ओळख झाली होती. दरम्यान पॅरिसमध्ये Institut Pasteurचे वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसाचा एक नवा व्हेरिएंट पाहिला होता, जो गेल्या व्हेरिएंटपेक्षा खूप वेगळा होता. डेल्टाक्रॉन एका उत्तर फ्रासच्या वृद्ध व्यक्तीच्या नमुन्यात आढळला होता. नमुन्याची तपासणी केल्यावर हा व्हेरिएंट खूप वेगळा दिसत होता. डेल्टाक्रॉनचे जास्त करून जेनेटिक्स हे डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे होते, जो गेल्यावर्षा अखेरीस जगभरात डोमेनेंट व्हेरिएंट होता.

डेल्टाक्रॉनची मुख्य लक्षणे

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, ओमिक्रॉन आणि डेल्टाचे रिकॉम्बिनेशन असलेल्या या व्हेरिएंटची लक्षणे, गेल्या कोरोना व्हायरसप्रमाणे आहेत. परंतु वैज्ञानिक अजूनही या व्हेरिएंटवर रिसर्च करत आहेत आणि इतर लक्षणांचा शोध घेत आहे.

डेल्टाक्रॉन नव्हे, तर ‘या’ व्हेरिएंटमुळे येईल तिसरी लाट – डॉ. रवी गोडसे