Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश मनोज वाजपेयीच्या चित्रपटावर बंदीची मागणी, आसाराम बापूंच्या जीवनावर आधारित सिनेमा

मनोज वाजपेयीच्या चित्रपटावर बंदीची मागणी, आसाराम बापूंच्या जीवनावर आधारित सिनेमा

Subscribe

मनोज वाजपेयी यांच्या आगामी 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. 8 मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.

मनोज वाजपेयी यांच्या आगामी ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. 8 मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. ट्रस्टच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली आहे की, चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन कोणत्याही प्रकारे थांबवावे. वकिलाचे म्हणणे आहे की या चित्रपटामुळे आसाराम बापू यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे. (Demand for ban Manoj Vajpayee’s film, alleging that it based on Asaram Bapu life)

हेही वाचा – “…’हा’ सिनेमा टॅक्स फ्री करून दाखवा”, जितेंद्र आव्हाडांचे राज्य सरकारला आवाहन

- Advertisement -

मनोज वाजपेयी अभिनीत ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटात एका 16 वर्षांच्या मुलीवर एका बाबाने बलात्कार केल्याचे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित असल्याचे चित्रपटाच्या सुरूवातीलाच स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बाबाचे रूप थेट आसारामशी मिळतेजुळते आहे, त्यामुळे हा चित्रपट केवळ आसारामच्या वादाशी संबंधित आहे, हे दिसून येत आहे.

या चित्रपटाशी संबंधित नोटीस दिग्दर्शकांना पाठविण्यात आल्यानंतर या चित्रपटाचे निर्माते आसिफ शेख यांनी एका प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की, “होय आम्हाला नोटीस मिळाली आहे. आता या प्रकरणी पुढे नेमके काय करण्यात येईल, याबाबत आमच्या वकिलांकडून ठरवण्यात येईल. आम्ही वकील पीसी सोलंकी यांच्यावर बायोपिक बनवला असून त्यासाठी आम्ही त्यांच्याकडून हक्कही विकत घेतले आहेत.”

- Advertisement -

त्यामुळे आता कोणी येऊन सांगत असेल की हा चित्रपट त्यांच्यावर आधारित आहे, तर आपण त्याला काहीही करू शकत नाही. आपण कोणाचा विचार थांबवू शकत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सत्य काय ते समोर येईल. दरम्यान, हा चित्रपट 23 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE 5 वर प्रदर्शित होणार आहे.

कोण आहेत पी. सी. सोलंकी?
हा चित्रपट आसाराम बापूविरोधात खटला लढणारे वकील पीसी सोलंकी यांच्यावर आधारित आहे. मनोज वाजपेयी यांनी चित्रपटात त्यांची भूमिका साकारली आहे. पीसी सोलंकी यांचे पूर्ण नाव पूनम चंद सोलंकी आहे. आसाराम प्रकरणात बलात्कार पीडितेच्या बाजूने वकिली करणारे पी.सी. सोलंकी यांनी ही केस तर लढवलीच पण त्या मुलीला न्यायही मिळवून दिला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी पी. सी. सोलंकी यांनी ही केस लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना धमक्याही देण्यात आल्या. तर काही लोकांनी आमिष देखील दिले. मात्र त्यांनी त्याची पर्वा केली नाही. त्यामुळेच आज आसाराम तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आसारामच्या वतीने देशातील नामवंत व दिग्गज वकिलांनी बाजू मांडली. या वकिलांच्या समोर पी.सी.सोलंकी यांनी अत्यंत हुशारीने बाजू मांडली आणि कोणतीही भीती न बाळगता खटला निकाली काढला.

- Advertisment -