घरदेश-विदेशताजमहालचे नाव होणार आता तेजो महालय? आग्रा महापालिकेत सादर होणार प्रस्ताव

ताजमहालचे नाव होणार आता तेजो महालय? आग्रा महापालिकेत सादर होणार प्रस्ताव

Subscribe

याबाबत अधिकारी मौन बाळगून आहेत, मात्र प्रस्ताव आल्याचे महापौर सांगतात. या प्रस्तावाचे आज सभागृहात वाचन होणार असून सर्व बाबींचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल.

निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक आणि जगातील सहावे आश्चर्य असलेले ताजमहाल नेहमीच चर्चेत असते. अशाच ताजमहाल आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. ते कारण म्हणजे आग्राच्या ताजमहालच्या नावातील बदल. गेल्या अनेक दिवसांपासून ताजमहालचे नाव बदलण्याची चर्चा जोर धरत आहे. यासाठी आग्रा येथील भाजप नगरसेवकांकडून ताजमहालचे नाव बदलण्याची ही मागणी केली जात आहे. याबाबतचा प्रस्ताव आज आग्रा महापालिकेत येणार आहे. भाजपचे नगरसेवक शोभाराम राठोड यांनी ताजमहालचे नाव बदलून तेजो महालय करण्याबाबत चर्चा केली आहे. याबाबत अनेक तथ्य त्यांनी आपल्या प्रस्तावात मांडले असून, त्या आधारे हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात येणार असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

भाजप नगरसेवकाने केली मागणी 

भाजपचे नगरसेवक शोभाराम राठोड यांचे म्हणणे आहे की, गेल्या साडेचार वर्षांत सुमारे 80 रस्त्यांचे आणि चौकांचे नामांतर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ताजमहालचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. एवढेच नाही तर शोभाराम राठौर हे ताजगंजचे नगरसेवक आहेत, याच भागात ताजमहाल येतो. ताजमहालमधील भिंतींवर कमळाच्या आकारासारख्या हिंदू संस्कृतीच्या अनेक खुणा आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत ताजमहालचे नाव बदलले पाहिजे.

- Advertisement -

तेजो महालय नाव करण्यामागे कारण काय?

ताजमहालचे नाव बदलण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. याबाबत विविध दावे करण्यात आले आहेत. काही लोकांचा दावा आहे की ताजमहालची जागा पूर्वी शिवमंदिर होती. इसवी सन १२१२ मध्ये परमदेवाने तेजो महालय बांधले. ताजमहालच्या 22 खोल्यांमध्ये मंदिराचा पुरावा आहे. याशिवाय ताजमहालच्या आजूबाजूला हिंदू वास्तुकला असल्याचा दावा केला जातो. ‘ताज’ आणि ‘महल’ हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. संगमरवरी जाळीमध्ये 108 कलश आहेत.

प्रस्तावाचे सभागृहात होईल वाचन

महापास्लिवकेच्या आज होणाऱ्या सभेत नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. याबाबत अधिकारी मौन बाळगून आहेत, मात्र प्रस्ताव आल्याचे महापौर सांगतात. या प्रस्तावाचे आज सभागृहात वाचन होणार असून सर्व बाबींचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल.


चिनूक हेलिकॉप्टरला आग लागण्याच्या भीतीने अमेरिकन सैन्याने उड्डाणे थांबवली, भारताने मागवला अहवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -