घरदेश-विदेशदहावीच्या अभ्यासक्रमात आता 'लोकशाही'ला स्थान नाही, NCERT चा धक्कादायक निर्णय

दहावीच्या अभ्यासक्रमात आता ‘लोकशाही’ला स्थान नाही, NCERT चा धक्कादायक निर्णय

Subscribe

NCERT ने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. NCERT ने घेतलेल्या एका निर्णयानुसार दहावीच्या पुस्तकातून लोकशाहीचा धडा काढून टाकण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात शालेय अभ्यासक्रमात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. याआधी अनेकदा महत्त्वाचे विषय हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. पण आता NCERT ने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. NCERT ने घेतलेल्या एका निर्णयानुसार दहावीच्या पुस्तकातून लोकशाहीचा धडा काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकशाहीची मुल्ये विद्यार्थ्यांनी शालेय जिवनात शिकणे गरजेचे आहेत, तोच धडा आता हद्दपार केल्याने यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – DU Political Science: ‘सारे जहाँ से अच्छा…’ आता शिकवलं जाणार नाही; कवी इक्बाल अभ्यासक्रमाबाहेर

- Advertisement -

NCERTने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार दहावीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरची आव्हाने हे घटकही वगळण्यात आले आहेत. याबाबतचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार असलेले जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही करण्यात आलेले आहे. “लोकशाहीचे अस्तित्वच शिल्लक नाही तर पुस्तकात का ठेवायचे?” असे ट्वीट करत त्यांनी देशातील लोकशाहीवर टीका केली आहे.

- Advertisement -

तर महत्त्वाची बाब म्हणजे फक्त लोकशाहीचा धडाच नाही तर दहावीच्या सायन्सच्या पुस्तकातून आवर्तन सारणी म्हणजेच पिरियॉडीक टेबलही काढून टाकण्यात आले आहे, त्यामुळे NCERT बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच विज्ञानाच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्याने वाद निर्माण झाला होता. त्या पाठोपाठ आता हा नवा मुद्दा समोर आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आला आहे. याआधी अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास, गुजरात दंगलीशी संबंधित मजकूर, नक्षलवादी चळवळीची ओळख, दलित चळवळीतील लेखकांची नावं वगळण्यात आलेली होती.

तर अगदी चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांचे नाव दिल्ली विद्यापीठाच्या बीए कार्यक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे डीयूमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कवी इक्बाल यांच्याबद्दल शिकवले जाणार नाही. आतापर्यंत इक्बाल यांना बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात शिकवले जात होते. दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीनंतर कवी इक्बाल अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येणार आहेत . याशिवाय इतर काही प्रस्तावांनाही शैक्षणिक परिषदेने मंजुरी दिलेली असल्याची माहिती समोर आली आहे.

तर याच वर्षी एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातील 12 वीचे विद्यार्थी हे मुघलांचा इतिहास शिकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार योगी सरकारने 12वीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल करत 12वीच्या वर्गात शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला. याशिवाय इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींचा संघर्ष आणि औद्योगिक क्रांतीचे धडेही काढून टाकण्यात आले आहेत. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापासून हा बदल लागू करण्यात आला आहे. यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडाही काढून टाकण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -