घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या बँक लॉकरची सीबीआयकडून चौकशी, चार तास उलटले

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या बँक लॉकरची सीबीआयकडून चौकशी, चार तास उलटले

Subscribe

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. जवळपास चार तास उलटून गेले आहेत. सीबीआयने 11 वाजता मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची तपासणी करायला सुरुवात केलीय. गाझियाबादच्या वसुंधरा सेक्टर 4 इथल्या पंजाब नॅशनल बँकेत मनीष सिसोदिया यांचे बँक लॉकर आहे. त्यांच्या तपासासाठी सीबीआयचं पथक या बँकेत पोहोचलं आहे.

मनीष सिसोदिया आणि त्यांच्या पत्नीचे गाझियाबादच्या वसुंधरा सेक्टर-4 येथील पंजाब नॅशनल बँकेत लॉकर आहे. येथे सीबीआय बँक लॉकरची माहिती तपासणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआय येण्याआधीच बँकेबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी झाली होती.

- Advertisement -

सीबीआयने छापेमारी केल्यानंतर सिसोदिया यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या बँकेच्या लॉकरमधून काहीही बाहेर काढले गेले नाहीये. मी आणि माझे कुटुंब सत्याच्या बाजूने आहोत. सीबीआयला मला २-३ महिन्यांसाठी तुरुंगात पाठवायचे आहे, असे सिसोदिया म्हणाले.

मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे की, सीबीआय आमचे बँक लॉकर पाहण्यासाठी येत आहे. 19 ऑगस्टला माझ्या घरावर घालण्यात आलेल्या 14 तासांच्या छाप्यात काहीही सापडले नाही. लॉकरमध्येही काहीही सापडणार नाही. CBIचे स्वागत आहे. तपासात मला व माझ्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य असेल.

- Advertisement -


हेही वाचा : नितीश कुमार, लालूप्रसाद यादवांची अवस्था अखिलेश यादव अन् मायावतींसारखी होणार; सुशील मोदींचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -