महिला उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कौतुकासाठी बनवला TikTok Video

pushpa shreevani with cm jaganmohan readdy
आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पुष्पा श्रीवानी आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी

आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पी. पुष्पा श्रीवानी यांचा एक टिकटॉक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एस. जगन मोहन रेड्डी यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांनी एक गाणे गात त्याचा टिकटॉक व्हिडिओ केला आहे. श्रीवानी या व्हिडिओत प्रसिद्ध तेलगू गीत “रायलसीमा मुडुबिडा मन जगन अन्ना” गाताना दिसत आहे. ३३ वर्षांच्या असलेल्या उपमुख्यमंत्री पुष्पा श्रीवानी यांचा हा व्हिडिओ आता आंध्रात चांगलाच गाजत आहे.

Deputy CM Pushpa Srivani garu ????❤️?

Devarapalli Naresh ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 31, 2019

 

उपमुख्यमंत्री पुष्पा श्रीवानी गात असलेले गीत वायएसआर काँग्रेस पक्षाने मे महिन्यात जगनमोहन हे मुख्यमंत्री झाल्यानंतर बनवले होते. या गाण्यामध्ये त्यांना रायलसीमाचे पुत्र असल्याचे संबोधले आहे. रायलसीमा हे मुख्यमंत्री जगनमोहन यांचे गाव आहे. रायलसीमा भागात झालेल्या विकासाची प्रशंसा या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

पुष्पा श्रीवानी या आंध्र प्रदेशच्या आदिवासी कल्याण मंत्री आहेत. मुख्यमंत्री जगनमोहन यांनी तीन राजधान्या करण्याबाबतचा प्रस्ताव मांडलेला आहे. या प्रस्तावावरुन सध्या राजकारण तापले असल्याच्या पार्श्वभूमीवर पुष्पा श्रीवानी यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. सध्या आंध्रची राजधानी अमरावती मधील नागरिक मुख्यमंत्र्यांच्या तीन राजधानी असलेल्या प्रस्तावावर नाराज आहेत.

जगनमोहन रेड्डी यांनी अमरावतीसोबतच विशाखापट्टनमला प्रशासकीय राजधानी आणि कुरनूलला न्यायिक राजधानी बनविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर श्रीवानी या विजय नगरम या जिल्ह्यातून येतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका तेलुगू चित्रपटात अभिनय देखील केला होता.