घरदेश-विदेशआपच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार, नायब राज्यपालांचे आदेश

आपच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार, नायब राज्यपालांचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली – दिल्लीत सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. नायब राज्यपालांनी आता आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आतिशी, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी असं नायब राज्यपालंच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या पत्रात म्हटलं आहे.


“आम आदमी पक्षाच्या आरोपांमुळे प्रतिमेचे हनन झाले आहे. बेछूट आरोप करणे हा केजरीवाल आणि कंपनीचा हॉलमार्क आहे. सत्य समोर येताच, ते माफी मागतात. या निराधार, बेछूट आरोपांची नायब राज्यपालांनी गंभीर दखल घेतली आहे. या नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे नायब राज्यपालांच्या कार्यालयातून प्रसिद्धकरण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल व्हि.के. सक्सेसना खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचेही अध्यक्ष होते. या काळात त्यांनी १४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमीच्या नेत्यांकडून करण्यात आला. तसंच, नोटाबंदीनंतर २०१६ मध्ये १४०० कोटींच्या नोटा बदलून देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांवर मोठा दबाव आणला असल्याचा आरोपही आपकडून करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या राज्यपालांनी आपच्या आमदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -