Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Updates: २५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती

Live Updates: २५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी पत्राद्वारे केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली आहे.

- Advertisement -

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्राम विकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.


दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री, उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांच्याकडे जाणार


- Advertisement -

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळायला सुरुवात झाली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा देण्यासाठी यंदा ट्रान्सजेंडर मुलांची संख्या वाढली. बारावीचे १६२ विद्यार्थी तर दहावीचे १०२ विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत.


अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार? देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख हे दिल्लीला जाणार आहेत. उच्च न्यायालयातल्या निकालानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. काही मोठ्या व्यक्ती आणि वकिलांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.


गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्यामागे उशीर झाला – फडणवीस

कोर्टाच्या निर्णयामुळे राजीनामा दिला

संजय राठोड प्रकरणाचीही सीबीआय चौकशी व्हावी – फडणवीस


गृहमंत्री अनिल देशमुख पदाचा राजीनामा देणार – नवाब मलिक


कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करुन वक्तव्य करण्यात येईल. अभ्यास न करता बोलणे योग्य नसेल असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

देशातील कोणताही तपास यंत्रणा परमेश्वर नाही – राऊत


सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक सुरू. शरद पवार, अजित पवार, अनिल देशमुख या बैठकीत उपस्थित.


गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्राच्या हवाले समोर येत आहे.


मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भेटीला, हायकोर्टाच्या निर्णयानंतर हालचालींना वेग


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (५ एप्रिल) मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.


गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा देऊन सीबीआय चौकशीला सामोरे जावे – फडणवीस

या सर्व प्रकरणातील मुख्यमंत्र्यांची भूमिका आश्चर्यजनक

मुख्यमंत्र्यांनी पदाचा आणि घरण्याचा मान राखून तात्काळ योग्य कारवाई करावी – फडणवीस

एवढी मोठी घटना घडलेली असताना मुख्यमंत्र्यांनी एकही प्रतिक्रिया दिली नाही हे आश्चर्यजनक – फडणवीस


परमबीर सिंह यांच्या आरोपाची सीबीआय चौकशी

मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश

१५ दिवसात सीबीआयला द्यावा लागणार अहवाल

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वार


जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कोरोना पॉझिटिव्ह

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. गडाख यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे.


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यात ५ जणांना कोरोनाची लागण, वर्षा गायकवाड होम क्वारंटाईन


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगडमध्ये दाखल, शहिद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली


पत्रकारांना कोरोना लस द्या, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (सविस्तर वाचा)


अभिनेता अक्षय कुमार कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला आहे. याबाबत अक्षय कुमारने स्वतः माहिती दिली आहे.


वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब (सविस्तर वाचा)


राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही – डॉ. शेखर मांडे (सविस्तर वाचा)


देशात १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद (सविस्तर वाचा)


महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही असे सीएसआयआरचे महासंचालक डॉ.शेखर मांडे यांनी म्हटले आहे.


परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज हाय कोर्टात सुनावणी

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी करण्यात येणार


दादर भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी झाली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असून काही ग्राहकांनी मास्क लावला नव्हता


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली कोरोनाची लस


आजपासून राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी

कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ते सोमवार सकाळी असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

- Advertisement -