Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ५९ हजार ९०७ नवे रुग्ण

Live Updates: राज्यात गेल्या २४ तासांत ५९ हजार ९०७ नवे रुग्ण

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मंगळवार पाठोपाठ बुधवारीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या पार गेली. बुधवारी राज्यात ५९ हजार ९०७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. बुधवारी राज्यात ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.


निलंबित पोलीस साहायक सचिन वाझे यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. परब यांनी सचिन वाझेंकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. मात्र, या विषयावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -


नाशिक येथील मनसे नेते नंदू आबा शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी सटाणा-साक्री रोडवर स्कोडा गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.


- Advertisement -

सचिन वाझे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. पण हे आरोप परब यांनी फेटाळले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या दोन मुलींची आणि बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो, सचिन वाझेंचे माझ्यावरील आरोप खोटे आहेत, असं अनिल परब म्हणाले.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं सर्व राज्यांना सूचना, ऑफिसेसमध्ये लसीकरणाला सुरुवात करा, ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना लस द्या, असा आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिला आहे.


सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत दोन दिवसांची वाढ, ९ एप्रिलपर्यंत सचिन वाझे एनआयए कोठडीतच


एनआयच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला वेळ हवा, स्फोटकाप्रकरणी परमबीर सिंह यांनी एनआयसमोर नोंदवला जबाब


परमबीरांची एनआयए चौकशी अखेर संपली, तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर परमबीर सिंग एनआयए कार्यालयातून बाहेर


प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात दाखल


१८ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरणाची परवानगी देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आज मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राला इतर राज्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा अशीही मागणी केली आहे.


परमबीर सिंह एनआयए कार्यालात दाखल, सकाळी ९.३० पासून सिंह यांची चौकशी सुरु, १०० कोटींच्या लेटरबॉम्बप्रकरणी गेल्या तासाभरापासून चौकशी सुरु


शरद पवार यांनी निवासस्थानी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस


केंद्र सरकारने लसीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा- संजय राऊत


नववी ते बारावी परीक्षांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आज पुन्हा शिक्षण विभागाने  महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. याबाबत काल राज ठाकरेंनीही दहावीस बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा सल्ला दिला होता.


मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पुढील साठा येईपर्यंत मुंबईत कोरोना लसीचे फक्त 1 लाख 85 हजार डोस शिल्लक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


 

- Advertisement -