घरताज्या घडामोडीमोदी सरकारच्या 'या' स्किमसाठी तयार करा Logo मिळेल ५० हजारांचे बक्षीस

मोदी सरकारच्या ‘या’ स्किमसाठी तयार करा Logo मिळेल ५० हजारांचे बक्षीस

Subscribe

स्पर्धेत देशातील कानाकोपऱ्यातील लोक सहभाग घेऊ शकतात.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशासाठी अनेक नव्या योजना राबवत आहेत. त्याअर्तंगत अनेकांना मोठा फायदा होत आहे. केंद्र सरकारने एक स्पर्धा आणली आहे ती जिंकल्यास ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) या योजनेअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेकरिता एक लोगो डिझाइन करुन हवा आहे. त्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. My Gov India या ट्विटर हँडलवर यासंबंधी एक ट्विट करण्यात आले आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आल आहे.  या स्पर्धेत देशातील कानाकोपऱ्यातील लोक सहभाग घेऊ शकतात. लॉकडाऊनच्या काळात घर बसल्या या योजनेसाठी लोगो डिझाइन करुन पैसे कमाविण्याची संधी चालून आली आहे. पण यासाठी रजिस्ट्रेसन कसे करायचे? जाणून घ्या. (design logo for the Modi government’s one nation one ration card scheme)

वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेकरिता घेण्यात आलेल्या लोगो डिझाइन स्पर्धेत वयाची मर्यादा देण्यात आलेली नाही. कोणत्याही वयोगटातील नागरिक यात सहभाग घेऊ शकतो. हा लोगो हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतो. त्यामुळे दोन्ही भाषेत लोगो तयार करु शकता. त्याचबरोबर लोगो तयार केल्यानंतर त्याची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती १०० शब्दात देणे अनिवार्य आहे. लोगो तयार झाल्यानंतर लोगोचा फॉर्मेट jpg,Bmp किंवा TIFF हाय रेझॉल्यूशन इमेजमध्ये तुम्हाला तो पाठवायचा आहे. ३१ मे पर्यंत या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

- Advertisement -

रजिस्ट्रेशन कसे कराल?

  • पहिल्यांदा MyGov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जा.
  • तिथे कॉन्टेस्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर Log in to Participant टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी लागणारी आवश्यक माहिती भरा.
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची एन्ट्री दाखल करावी लागेल.

हेही वाचा – PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांना सरकार देत आहे स्वस्त लोन, कसे कराल अप्लाय? जाणून घ्या

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -