घरCORONA UPDATECorona Crisis: यंदा १५ हजार Freshers ची भरती करणार 'ही' नामांकित कंपनी!

Corona Crisis: यंदा १५ हजार Freshers ची भरती करणार ‘ही’ नामांकित कंपनी!

Subscribe

कंपनीच्या सेवेसाठी मागणी चांगली आहे आणि भविष्यासाठी चांगल्या ऑर्डर देखील मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीने ही भरती करण्याचा निर्णय घेतलाय

जगभरात कोरोनाचं संकट आलं त्यानंतर कोरोनादरम्यान अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेला तर काही कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. मात्र कोरोना संकट असूनही, एचटीएल टेक्नोलॉजीज (HCL Technologies) आयटी सर्व्हिसेस कंपनी यावर्षी १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. कोरोना संकट असूनही, कंपनीच्या सेवेसाठी मागणी चांगली आहे आणि भविष्यासाठी चांगल्या ऑर्डर देखील मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीने ही भरती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

…म्हणून केली जातेय भरती

योजनेनुसार कंपनी थेट कॅम्पसमधून १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. मागील वर्षी कंपनीने केवळ ९ हजारच फ्रेशरची भरती केली होते. कंपनीने आपली भरती आणि ऑनबोर्डिंग प्रक्रिया वर्च्युअल केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ही भरती दोन कारणांकरता केली जात आहे. एक म्हणजे कंपनीला विकासासाठी लोकांची आवश्यकता आहे आणि दुसरे म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी नोकर्‍या सोडल्यामुळे इतर जागा रिक्त आहेत.

- Advertisement -

या दिग्गज असणाऱ्या कंपन्या करणार भरती

कंपनीचे एचआर प्रमुख म्हणाले की कोरोना महामारीमुळे देशभरातील महाविद्यालये परिसर बंद आहेत, ज्यामुळे भरती प्रक्रिया थोडी मंदावली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात HCL Technologies ने सुमारे १ हजार फ्रेशर भरती केले आहेत. दरम्यान Technology मध्ये दिग्गज असणारी टीसीएस आणि विप्रो यावर्षी अनेक फ्रेशर्सना नोकर्‍या देणार असल्याचे सांगितले जात आहे.

जून तिमाहीत HCL Technologies चा निव्वळ नफा २,९२५ कोटी होता. या काळात कंपनीचे उत्पन्न ८.६ टक्क्यांनी वाढून १७ हजार ८४१ कोटी रुपये झाले. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. विजयकुमार यांच्या मते, प्रतिकूल परिस्थितीमुळे जूनच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होणारच होता, परंतु मागणीचे वातावरण चांगले आहे आणि भविष्यासाठी ऑर्डरबुकही चांगली आहे.

- Advertisement -

दरम्यान, अलीकडेच ज्येष्ठ व्यावसायिक शिव नाडर यांनी एचसीएल तंत्रज्ञानाचे अध्यक्षपद सोडले आहे. तर एचसीएल तंत्रज्ञानाचे अध्यक्ष शिव नाडर यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


Job: ठाणे महानगरपालिकेत नर्स पदासाठी भरती; असा करा अर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -