Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश अपघातात दोन पाय, एक हात गमावल्यानंतरही सूरजने जिद्दीने पास केली UPSC परीक्षा

अपघातात दोन पाय, एक हात गमावल्यानंतरही सूरजने जिद्दीने पास केली UPSC परीक्षा

Subscribe

नवी दिल्ली : आपले लक्ष्य तेच गाठतात जे स्वप्न बघतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेवतात. उत्तर प्रदेशातील मैनपुरीच्या मोहल्ला घरनाजपूरयेथील दिव्यांग तरुणाने जिद्दीने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC) परीक्षेत यश प्राप्त केले आहे. (Despite losing two legs and one arm in an accident, Suraj persevered through the UPSC exam)

यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या दरवर्षी अनेक वेदना देणाऱ्या कथा आपल्या समोर येतात. अशीच एक कथा सूरज तिवारी आहे. 2017 मध्ये गाझियाबादच्या दादरी येथे एका रेल्वे अपघातात सूरजने दोन्ही पाय, उजवा हात  आणि डाव्या हाताची दोन बोटे गमावली आहेत. यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिला आणि तीन महिने घरी अंथरुणावर होता, पण त्याने हार मानली नाही. आपल्या दिव्यांग परिस्थितीवर मात करत त्याने यूपीएससीच्या परीक्षेत 917 वे रँकिंग मिळवले आहे. सूरजच्या या यशानंतर त्याच्या घरी अभिनंदन करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे.

- Advertisement -

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची पास
सूरजने 2018 मध्ये जेएनयू दिल्लीत बीएमध्ये नव्याने प्रवेश घेतला. त्याने 2021 मध्ये बीए पास करून एमएला प्रवेश घेतला. लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे सूरजने एमए अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी सुरू करत होता. रात्र रात्र जागून तो अभ्यास करत होता. तीन बोटांच्या मदतीने पेपर सोडवण्यासाठी हवा असलेला वेग मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेत यूपीएससीचे अवघड शिखर पहिल्याच प्रयत्नात सर केले.

सूरजच्या घरची परिस्थिती बेताची
सूरजचे वडील राजेश तिवारी हे व्यवसायाने शिंपी आहेत. ते कपडे शिवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजेश तिवारी यांना तीन मुलगे आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा राहुल तिवारी यांचे निधन झाले असून लहान मुलगा राघव तिवारी बीएससी करत आहे, तर मुलगी प्रिया बीटीसी करत आहे.

- Advertisement -

अखिलेश यादव यांनी सूरजच्या धैर्याला सलाम केला आहे
यूपीएससी निकाल जाहीर झाल्यानंतर सूरजच्या यशोगाथेबद्दल देशभर चर्चा सुरू झाली आहे. यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही सूरजच्या धैर्याला सलाम त्याचे अभिनंदन केले. अखिलेश यादाव यांनी ट्वीट करत म्हटले की, “मैनपुरीच्या दिव्यांग सूरज तिवारीने पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा उत्तीर्ण होतना हे सिद्ध केले की दृढनिश्चयाची शक्ती इतर सर्व शक्तींपेक्षा मोठी आहे. या ‘सूर्या’सारख्या कामगिरीबद्दल सूरजचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.!”

 

 

- Advertisment -