घरदेश-विदेशदिल्ली अपघात : माहिती असूनही अंजलीला गाडीखालून फरफटत नेले, चौकशीतून बाब समोर

दिल्ली अपघात : माहिती असूनही अंजलीला गाडीखालून फरफटत नेले, चौकशीतून बाब समोर

Subscribe

Delhi Kanzawala case| या प्रकरणातील आरोपी अंकुश खन्ना याला दिल्लीच्या कोर्टाने जामीन मंजूर केलाय. त्याने शरणागती स्वीकारल्याने तो जामीनपात्र असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. त्यामुळे त्याला वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

नवी दिल्ली – कांजवाला हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पीडित तरुणी गाडीखाली अडकल्याची माहिती नव्हती असा दावा करणाऱ्या आरोपींनी आता मोठा खुलासा केला आहे. गाडीखाली मृतदेह अडकल्याचं माहित होतं, पण भीतीमुळे काढला नाही, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

हेही वाचा – अंजलीची मैत्रीण करायची गांज्याची विक्री; दोघींचे झाले होते कडाक्याचे भांडण

- Advertisement -

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत मोठी घटना घडली होती. एका तरुणीला काही आरोपींनी कारखाली चिरडले. एवढंच नव्हे तर तिला गाडीखालून फरफट तब्बल १२ किमीपर्यंत नेले. पीडित तरुणी कारखाली अडकली असल्याची माहिती नव्हती, अशी कबुली आरोपींनी दिली होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीतून आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाडीत असणाऱ्या आरोपींना त्यांच्या गाडीखाली आलेल्या मृतदेहाची माहिती होती. पण या प्रकरणात अडकू या भीतीने त्यांनी मृतदेह १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेला.

या प्रकरणातील आरोपी अंकुश खन्ना याला दिल्लीच्या कोर्टाने जामीन मंजूर केलाय. त्याने शरणागती स्वीकारल्याने तो जामीनपात्र असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. त्यामुळे त्याला वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील कांजवाला येथे बोलेरो जीपने अंजलीच्या स्कुटीला धडक देऊन अंजलीला खाली पाडले. जीपमध्ये अडकलेल्या अंजलीला जीपने १३ किमी फरफटत नेले. यात अंजलीचा मृत्यू झाला. अपघातात अंजलीच्या अंगावरील सर्व कपडे फाटले. अंजलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी तपास करत तरुणीला धडक देणाऱ्या जीपमधील पाच आरोपींना अटक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने करुन या घटनेतील आरोपींना अटक केली.

अंजलीला जीपने फरफटत नेल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याआधारवरही पोलिसांनी तपास केला. अपघातातील मृत तरुणी अंजली सिंह न्यू इअर पार्टीवरून घरी परतत असताना तिच्या स्कूटीवर मागे एक मुलगी बसली होती. निधी असे त्या मुलीचे नाव असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. जीपने धडक देताच मृत तरुणी अंजली आणि तिची मैत्रीण निधी खाली कोसळली, स्कूटीवरून खाली पडताच अंजली जीपच्या चाकात अडकली, जीप अंजलीला फरफटत घेऊन जात असल्याचे पाहून निधी बिथरली आणि ती घटनास्थळावरून घरी निघून गेली, असे पोलीस तपासात उघड झाले.

त्यानंतर पोलिसांनी निधीचीही माहिती गोळा केली. निधीवर गांजा तस्करीचा आरोप असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेआधी अंजली व निधीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. पैसे देण्यावरुन हे भांडण झाले होते, असे अंजलीच्या मित्राने पोलिसांना सांगितले. या घटनेतील कार मालक व अन्य एक जण पोलिसांना शरण आला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -