पक्षाची काय अवस्था करून टाकलीय, संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे; फडणवीसांचा टोला

Devendra-Fadnavis1

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली असा आरोप सर्वत्र केला जातोय. आता यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनीही संजय राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे. त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते दिल्लीला आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Devendra Fadnavis criticize on Sanjay Raut)

हेही वाचा – …तर एक दिवस उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील, सचिन अहिरांनी व्यक्त केला विश्वास

देवेंद्र फडणीवसांनी गेल्या पंधरा दिवसात तीनवेळा दिल्ली दौरा केला आहे. या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं जातंय. यावरून देवेंद्र फडणवीसांना विचारले असता, विरोधकांचं कामच असतं टीका करण्याचं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच ही परिस्थिती आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – मला राजकारण सोडावं वाटतं, कारण…, सत्ताकारणावरून नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

दरम्यान, राजकारणात सत्ताकारण सुरू असल्याची टीका नितीन गडकरी केली होती. तसेच, राजकारण बदलत जातंय असंही ते म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की, राजकारणातील बदल यात नवीन काय आहे. राजकारणात बदल होतच असतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन; जे पोटात मळमळत होते, ते ओठावर आले, संजय राऊतांचा टोला

दरम्यान, गेल्या १५ दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस तीनवेळा दिल्लीला गेला. दोन्हीवेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. आज एकटेच गेले आहेत. तसेच, आज रात्री एकनाथ शिंदेही दिल्लीत दाखल होतील असं म्हटलं जातंय.