घरदेश-विदेशरक्षकच भक्षक झाल्यास सामान्यांनी कुणाकडे पाहायचं, वाझे प्रकरणावर फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

रक्षकच भक्षक झाल्यास सामान्यांनी कुणाकडे पाहायचं, वाझे प्रकरणावर फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

Subscribe

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली - फडणवीस

राज्यातील सर्व घटना तुमच्या समोर आहे. मुंबईत अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू, आणि खून केला गेला. अशी घटना महाराष्ट्रात आणि मुंबईत कधी झाली नाही. ९० च्या दशकात अशा क्रिमिनल घटना घडल्या आहेत. राजनितिक अपाराधीकरणाचा थरार पाहाल होता. तशीच परिस्थीती पुन्हा उद्भवली आहे. रक्षकच भक्षक झाले तर सामान्यांची रक्षा कोणा करणार असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मोठे खुलासे केले आहेत. तसेच मनसुख हिरेन प्रकरणात अनेक गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. मी मुख्यमंत्री पदी असताना सचिन वाझेंना पुन्हा सेवेत रूझू करण्यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकण्यात आला असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

एपीआय सचिन वाझेंना नोकरीवर पुन्हा का घेतले हा मोठा प्रश्ना निर्माण झाला आहे. सचिन वाझेंना २००४ मध्ये सस्पेंड करण्यात आले होते यानंतर २००७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर राजीनामा मंजूर झाला नाही कारण त्यांच्यावर खटला सुरु होता. परंतु २०१८ मध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावर दबाव टाकण्यात आला. त्यांना पोलीस सेवेत सरकारी सेवत पुन्हा रूझू करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी सचिन वाझेंची फाईल पाहिल्यानंतर मी अॅडव्होकेट जनरलची मदत घेणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

एपीआय सचिन वाझे यांचा शिवसेनेशी पुर्वीचे आणि घनिष्ट संबंध आहेत. तसेच शिवसेना आणि इतर व्यक्तिंसोबत त्यांचा व्यावसायिक संबंध होता. २०२० मध्ये म्हणजेच १९च्या शेवटी ठाकरे सरकार सत्तेत आले तेव्हा पुन्हा एकदा सचिन वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाल. महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती उद्भवली या कोरोना परिस्थितीसाठी एक कमिटी गठीत करण्यात आली या समितीने अहवाल सादर केला यामध्ये असे सांगण्यात आले की, राज्यात काही अधिकाऱ्यांची गरज आहे. उपस्थित अधिकारी कोरोनामुळे आजारी पडत आहेत. यामुळे सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत रुझू करण्यात आले. परंतु यामध्ये छोट्या कारणांमुळे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले नाही परंतु मोठ्या कारणांमुळे निलंबित केलेला अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत घेतले.

सचिन वाझे यांचा वसईतील भागात खंडणी मागण्यामध्ये सहभाग आहे. वसई विरारमध्ये सचिन वाझे खंडणी मागत होते. क्राईम इंटलिजेंस हेडमध्ये सचिन वाझे यांना घेतल्यानंतर एपीआयमधील २ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली यामध्ये सरकारच्या मर्जीचे अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सचिन वाझे यांना सीआययुचा प्रमुख करण्यात आले.

- Advertisement -

मुंबईतील सर्व हाय प्रोफाईल म्हणजेच मोठ्या केसेस सीआययुकडे देण्यात येत होत्या. मनसुख हिरेन आणि अंबानी स्फोटक प्रकरणाची केस रिजनकडे देण्यात यायला हवी होती परंतु ती केस सचिन वाझे यांच्याकडे देण्यात आली आहे. सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर खंडणी मागणी पुन्हा सुरु केली.

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली – फडणवीस

मनसुख हिरेन आणि सचि वाझे यांची पूर्वीपासून ओळख होती. सचिन वाझे यांनी मनसुख हिरे यांची स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली होती. परंतु अनेक महिने झाले तरी सचिन वाझे यांनी त्यांना पैसे दिले नाही त्यामुळे मनसुख हिरेन यांनी गाडी परत करण्याची मागणी केली. यावर सचिन वाझे यांनी गाडी काहीदिवस ठेवणार असल्याचे सांगितले यानंतर ४ महिने गाडी वापरल्यानंतर मनसुख हिरेन यांना स्कॉर्पिओ परत केली.

मनसुख हिरेन यांची गाडी चोरीला गेली नव्हती, ही गाडी चोरीला गेली असती तर त्या गाडीला खोलताना काही खाणा-खुणा निर्माण झाल्या असत्या परंतु तसे काही झाले नाही. सचिन वाझे यांनी मनसुखला कार पार्क करुन चावी देण्यास सांगितले. तसेच मनसुखला गाडी हरवल्याची तक्रार दाखल करण्यास सांगितले. मनसुख हिरेन यांनी कुर्ला पोलीस स्थानकात गाडी हरवल्याची तक्रार नोंदवण्यास सांगितले परंतु कुर्ला पोलीस स्थानकात ३ दिवसात शोध घेऊ असे सांगण्यात आले तक्रार घेत नव्हते. त्यामुळे सचिन वाझे यांनी एका ऑफीसरला फोन करुन तक्रार दाखल करण्यास सांगितले. यानंतर गाडी सापडल्यानंतर मनसुख हिरेनला क्राईम रजिस्टर करण्यासाठी सांगितले. मनसुख हिरेनला वाझे इंटरोगेट करत होते. या प्रकरणात आणखी यंत्रणा तपास करतील त्यामुळे पोलीसांचा त्रास होत असल्याचे पत्र लिहिण्यास सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला सांगितले. हेच पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले होते.

मनसुखला रात्री फोन आला. गावडे बोलवत आहे. परिसरात बोलवले तोच परिसर आहे ज्यामध्ये खंडणीचा गुन्हा आहे. त्यांची दुसऱ्या दिवशी शव मिळाले, तिथेच मारले. नंतर त्यांचे शव खाडीत फेकले, हाय टाईडमध्ये फेकण्याचा प्रयत्न
मनसुख हिरेन पळून गेला

मनसुख हिरेनला रात्री फोन करण्यात आला गावडे बोलवत असल्याचे त्यांना सांगितले होते. मनसुख हिरेन यांना ज्या वसईच्या भागात बोलवले जिथे वाझेंवर खंडणीचे गुन्हे दाखल होते. मनसुख हिरेन यांना बोलवण्यात आले त्याच्या दुसऱ्या दिवशी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. मनसुख हिरेन यांना त्याच जागी मारण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकला गेला. हाय टाईडमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला परंतु मृतदेह फेकल्याच्या अर्धातास नंतर लो टाईड आला त्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृतदेह जागीच रुतून बसला.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह पाहिल्यावर आणि त्यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसत आहे. सचिन वाझे यांच्या मास्कमध्ये एवढे रुमाल कुठून आले. हे रुमाल दाबून बांधले असल्याचे दिसत आहे. तसेच फडणवीस यांनी म्हटले की, जो रिपोर्ट पाहिला त्यात लंग्समध्ये पाणी नाही. जर पाण्यात मेले तर लंग्समध्ये पाणी दिसले पाहिजे होते त्यामुळे ही हत्या झाली हे स्पष्ट आहे असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एटीएस योग्या करावाई करत नाही – फडणवीस

मनसुख हिरेन प्रकरणात योग्य कारवाई करताना दिसत नाही आहे. ज्या अर्थी मला पुरावे मिळतात तर पोलीसांकडे जास्त पुरावे असतील. एटीएस आणि एनआयएकडे असे पुरावे आहेत ज्यामध्ये मनसुखचा आवाज आहे. त्यामुळे मनसुख प्रकरणही एनआयएकडे द्यायला हवे असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -