घरताज्या घडामोडीWine : वाईन उद्योजकांशी परदेशातील बैठकीचे अर्थकारण सरकारने सांगावे, फडणवीसांचा गौप्यस्फोट

Wine : वाईन उद्योजकांशी परदेशातील बैठकीचे अर्थकारण सरकारने सांगावे, फडणवीसांचा गौप्यस्फोट

Subscribe

ठाकरे सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या निर्णयामध्ये नेमकी काय डील झाली आहे, हे समजले पाहिजे असा मुद्दा त्यांनी मांडला. या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे. अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारने सुपर मार्केटच्या ठिकाणी वाईन विक्रीचा निर्णय हा नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेतला. या निर्णयानंतरच वाईन विक्रीला सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठीचा निर्णय घेण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही वाईनच्या कंपन्यांनी नव्याने एजन्सी घेतल्या आहेत. या निर्णयामागे मोठे अर्थकारण आहे. वाईनच्या उद्योजकासोबत कोणाची बैठक झाली ? कुठे झाली ? विदेशात झाली का ? असाही प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. शेतकऱ्यांचा विचार करून हा निर्णय नक्कीच घेण्यात आला नाही. यामागे फार मोठ अर्थकारण आहे. अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचीही टीका त्यांनी केली. महाराष्ट्र विधानसभेच्या १२ आमदारांच्या निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावरील पत्रकार परिषदेत ते बोलेत होते.

- Advertisement -

याआधी ८ वर्षापूर्वीही असाच निर्णय झाला होता, त्यावेळी आम्ही या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयासाठी नेमक काय डील झाले ? हे समजले पाहिजे. याआधीच्या निर्णयावर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळेच प्रचंड विरोधामुळेच सरकारला हा निर्णय मागे घेण्याची वेळ आली.

शेतकऱ्यांसाठी वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे हे शेतकरी विरोधी आहेत, या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेनेचे संजय राऊत प्रवक्ता आहेत, त्यांनी या निर्णयात नेमकी कोणती डील झाली ते सांगावे, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -