घरElection 2023देवेंद्र फडणवीसांची वाऱ्यावरची वरात; मध्यप्रदेश दौऱ्यावरून राऊतांनी लगावला टोला

देवेंद्र फडणवीसांची वाऱ्यावरची वरात; मध्यप्रदेश दौऱ्यावरून राऊतांनी लगावला टोला

Subscribe

मुंबई : मध्य प्रदेशात निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आपली पूर्ण ताकद लावून निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. आज राहुल गांधी मध्य प्रदेशात दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. तर भाजपाकडून मुख्यमंत्री शिवराज आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ही प्रचारात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मध्यप्रदेशातील बुरहानपूर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis Groom on the wind Sanjay Raut criticizes Madhya Pradesh tour)

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे. परंतु महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून ज्या पद्धतीने आपले सगळे भाजपाचे मंत्री, उपमुख्यमंत्री, नेते वाऱ्यावरची वरात करत आहेत. मात्र त्या वरातीतल्या घोड्याला निकाल लागल्यावर कळेल की आपण किती मागे पडलो आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – वसतिगृह, शाळांमधील भोजनपुरवठ्यामागे राजकीय खेळी; कंत्राटासाठी भाजप आमदार, मंत्र्याच्या जावयाची निवड

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री शिवराज रोज 4 ते 5 जाहीर सभा घेत आहेत. वेळापत्रकानुसार आज शिवराज कोटमा, चाचई, मांडला, बैहार आणि परसवाडा येथे जाहीर सभा घेणार आहेत. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया आज उत्तर उज्जैनमध्ये सभा घेणार आहेत. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुरहानपूरच्या शाहपुरा येथील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

काँग्रेसचा गेल्या आठवडाभराचा कृती आराखडा तयार

निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात काँग्रेसचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मध्य प्रदेश काँग्रेस पक्षाची हायकमांडही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. या आठवड्यात पक्षाचे वरिष्ठ नेते मध्य प्रदेशात प्रचार करणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. काँग्रेस पक्ष 33 सभा आणि रोड शो करणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – मनोज जरांगेंचा खटाटोप राजकीय फायद्यासाठी, विजय वडेट्टीवारांचा थेट आरोप

मिशन 2023 साध्य करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

मिशन 2023 साध्य करण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काँग्रेस 11 हमीपत्रांवर जनादेश मागत आहे. गेल्या आठवडाभरात 5 निवडणूक कार्यक्रमांमध्ये खर्गे सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांचे मध्य प्रदेशात 11 निवडणूक कार्यक्रम आहेत. यात ते 8 जाहीर सभा, 2 रोड शो आणि कॉर्नर सभा घेणार आहेत. याशिवाय प्रियांका गांधी 4 निवडणूक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पीसीसी प्रमुख कमलनाथ 13 निवडणूक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -