घरताज्या घडामोडीप्रियांका गांधीनी महाराष्ट्र सरकारला सल्ला का दिला नाही? देवेंद्र फडणवीसांचा गांधी कुटुंबावर...

प्रियांका गांधीनी महाराष्ट्र सरकारला सल्ला का दिला नाही? देवेंद्र फडणवीसांचा गांधी कुटुंबावर पलटवार

Subscribe

दुसऱ्या लाटेसाठी तयारी का नाही केली असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला केला होता.

देशात कोरोनापरिस्थिती चिंताजनक झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. रुग्णसंख्या वाढली असल्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कोरोनामुळे मृत्यूदरात वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. देशात पहिल्या लाटेनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहित असताना देशात आरोग्य सुविधा का नाही निर्माण करण्यात आल्या असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणाही साधला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रियांका गांधींच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. गांधी कुटुंबीयांकडून देशात वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप फडणीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रियांका गांधी यांच्यावर पलटवार करताना म्हटले आहे की, प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी वारंवार पत्रकार परिषद घेऊन देशात नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियांका गांधींनी केंद्र सरकारवर कोरोना परिस्थितीवर टीका केली त्यांना विचारु इच्छितो की कोरोना परिस्थितीवर कधी महाराष्ट्रातील सरकारशी चर्चा केली का? महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे याबाबत चर्चा केली का? देशात एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूपैकी ३८ ते ४० टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. तसेत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ३५ ते ३७ टक्के केसेस महाराष्ट्रातल्या असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारवर दुसऱ्या लाटेसाठी तयारी केली नसल्याची प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी केली होती. यावर फडणवीस यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त होती. तरिही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी महाराष्ट्रात का तयारी केली गेली नाही असा प्रश्न फडणीसांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारला सल्ला देण्यापेक्षा प्रियांका गांधींनी महाराष्ट्र सरकारला का सल्ला दिला नाही असा प्रश्नही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या होत्या प्रियांका गांधी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. देशात ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर सारख्या आरोग्य संसाधनांची निर्मिती का केली नाही. देशात दुसरी लाट येणार माहित असताना दुसऱ्या लाटेसाठी तयारी का नाही केली असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला केला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -