घरगणेशोत्सव 2022मंगळवेढा तालुक्यातील गणेश मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून तोडफोड, ऐन गणेशोत्सवात भाविक संतप्त

मंगळवेढा तालुक्यातील गणेश मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून तोडफोड, ऐन गणेशोत्सवात भाविक संतप्त

Subscribe

राज्यभरात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. ए

राज्यभरात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. एकिकडी गणेशोत्सवाचा उत्साह असताना, दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील गणेश मंदिर परिसरातील फरशांची तोडफोड केल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (devotees angry due to archeology department vandalized ganesh temple area)

गणरायाच्या आगमानाच्या दिवशीच माचणूर येथील गणेश मंदिर परिसरातील फरशांची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीनंतर तातडीने या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माचणूर येथे पाच हजार वर्षापूर्वीचे महादेवाचे अतिशय पुरातन मंदिर आहे. सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे. मात्र अनेकवेळा तक्रारी करून देखील पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

मंगळवेढा तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात गणेशाचेही पुरातन मंदिर आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणात घाण साचत होती. त्यामुळे एका भाविकाने गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागे आणि पुढील बाजूस फरशा बसवून घेतल्या होत्या. या फरशी बसवण्याच्या कामासाठीही पुरातत्व विभागाला याआधी अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, पुरातत्व विभागाने दखल न घेतल्याने एका भाविकाने या फारशा बसवून घेतल्या होत्या.

- Advertisement -

मात्र, आज पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माचणूर मंदिरात येऊन तोडफोड करण्यास सुरूवात केली. मात्र कोणालाही न सांगता थेट गणेश मंदिर परिसरात तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यामुळे स्थानिक भाविक आणि पुजारी विरोध करू लागताच तोडफोडीचे काम थांबवण्यात आले.

या मंदिराचे वैशिष्ट्ये

  • चार वर्षे औरंगजेबाची या ठिकाणी राजधानी होती.
  • त्याकाळी औरंगजेबाने महादेवाला गोमांसाचा नैवेद्य दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या नैवेद्याची फुले झाल्याची आख्यायिका आहे.
  • त्यानंतर संपूर्ण राज्यात हिंदूंची धार्मिक मंदिरे तोडणाऱ्या औरंगजेबाने माचणूरच्या मंदिराला दिल्ली दरबारातून बिदागी सुरु केली होती.
  • आजही हैदराबाद संस्थानाकडून या मंदिराला दरवर्षी श्रावणात बिदागी येते.

हेही वाचा – सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे दीर्घ आजाराने निधन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -